PM Narendra Modi : सणासुदीच्या हंगामात फक्त 'मेड इन इंडिया' उत्पादने खरेदी करा!

पंतप्रधान मोदींचे 'मन की बात'मधून जनतेला आवाहन


नवी दिल्ली : सणासुदीच्या हंगामात फक्त 'मेड इन इंडिया' (Made In India) उत्पादने खरेदी करा, असे आवाहन पंतप्रधान मोदींचे (PM Narendra Modi) 'मन की बात' (Mann Ki Baat) मधून जनतेला केले. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान 'मोदी मन की बात'च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करतात. आज ११४ वा एपिसोड प्रसिद्ध करण्यात आला. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी चौथ्यांदा या रेडिओ शोद्वारे (Radio Show) आपले मत व्यक्त केले. यावेळचा एपिसोडही खास आहे कारण तो प्रसारित होऊन दहा वर्षे पूर्ण करत आहे.पंतप्रधान मोदी यांनी या ‘मन की बात’ मध्ये अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ‘मेक इन इंडीया’ यावर विशेष भर दिला.


“या महिन्यात आणखी एका महत्त्वाच्या मोहिमेला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या मोहिमेच्या यशामध्ये देशातील मोठ्या उद्योगांचे लहान दुकानदारांचे योगदान समाविष्ट आहे. मी ‘मेक इन इंडिया’बद्दल बोलत आहे. आज मला खूप आनंद होत आहे. गरीब,मध्यमवर्ग आणि एमएसएमईंना या मोहिमेचा भरपूर फायदा होत आहे.“या सणासुदीच्या काळात तुम्ही तुमचा जुना संकल्प पुन्हा पुन्हा करा. तुम्ही जे काही खरेदी कराल ते फक्त मेड इन इंडियाच असले पाहिजे. तुम्ही जे काही भेट म्हणून द्याल तेही मेड इन इंडियाच असावे, असे मोदी म्हणाले.


ते म्हणाले,“आमच्या ‘मन की बात’च्या प्रवासाला १० वर्षे पूर्ण होत आहेत. १० वर्षांपूर्वी ३ ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’ सुरू करण्यात आली होती आणि हा असा पवित्र योगायोग आहे की, यंदा ३ ऑक्टोबरला ‘मन की बात’ला १०वर्षे पूर्ण होणार आहेत.


ते म्हणाले,२ ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छ भारत मिशन’ला १० वर्षे पूर्ण होत आहेत.ज्यांनी भारतीय इतिहासातील एवढी मोठी जनआंदोलन घडवली त्यांचे अभिनंदन करण्याचा हा एक प्रसंग आहे. हीच महात्मा गांधींना खरी श्रद्धांजली आहे. आयुष्यभर या कारणासाठी समर्पित राहिले.”

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी