वृत्ती भगवंतमय होणे याचेच नाव भक्ती

अध्यात्म - ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


भगवंतापासून पंचमहाभूते निर्माण झाली; आणि तसे बघितले, तर सर्व चमत्कार भगवंताच्या सामर्थ्याने पंचमहाभूतांचेच असतात. भगवंताच्या ठिकाणी जे-जे आहे ते-ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. भगवंत हा जगाचा मालक आहे. त्याच्या सत्तेने सर्व व्यवहार घडतात. आपण जीव त्याचा अंश आहोत. म्हणून आपण कर्तव्य करावे, आणि फळ भगवंताच्या इच्छेवर सोपवावे. आता प्रश्न असा आहे की, सर्व गोष्टी जर भगवंताच्या इच्छेने घडतात, तर माझी इच्छाही भगवंतच उत्पन्न करतो; आणि असे जर आहे, तर मी माझी इच्छा का मारावी? अगदी बरोबर आहे. रात्री अंधार पडतो त्याला कारण कोण? त्याला कारण सूर्य ! कारण सूर्य मावळला की, अंधार पडतो. याचा अर्थ असा की, ज्याप्रमाणे प्रकाशाचे कारण सूर्य आहे त्याचप्रमाणे अंधाराचे कारण पण सूर्यच आहे; फरक इतकाच की, प्रकाशाचे कारण तो असणेपणाने आहे, आणि अंधाराचे कारण तो नसणेपणाने आहे. हे जसे खरे, तसे माझ्या इच्छेचे कारणसुद्धा भगवंतच आहे, पण तो नसणेपणाने कारण आहे इतकेच. सारांश, भगवंताचा विसर पडला की, माझी इच्छा जन्म पावते. म्हणून, ज्याला भगवंत हवा असेल त्याने त्याचे स्मरण करावे आणि आपली इच्छा त्याला अर्पण करावी.


आपली देहबुद्धी नष्ट झाली की, भगवंत ओळखता येतो. ज्याप्रमाणे इमारतीचा नकाशा कागदावर असतो, त्याचप्रमाणे सगुणमूर्ती हेच आपले परब्रह्म. एकदा नकाशा पक्का झाल्यावर मग इमारत बांधणे जड जात नाही. सगुणमूर्तीचे ध्यान करावे. ‘ब्रह्म निराकार आहे, त्याला आकारात आणणे ही चूक आहे,’ असे कुणी कुणी म्हणतात. पण मी स्वत: जिथपर्यंत आकारात आहे तोपर्यंत सगुणमूर्तीचे पूजन आवश्यकच आहे. ‘मी रामाचा आहे’ म्हणणे म्हणजे ‘मी ब्रह्म आहे’ असे म्हणणे होय. तदाकार वृत्ती होणे याचे नाव अनुसंधान; आणि अनुसंधानाने वृत्ती भगवंतमय होणे याचे नाव भक्ती. ‘ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या’ याचा थोडक्यात अर्थ म्हणजे ‘जग जसे आहे असे आपण समजतो तसे ते नाही.’ -अंतर्बाह्य परमात्मा दिसू लागणे हेच भक्तीचे लक्षण आहे. याकरिता, आपल्या कृतीकडे भगवंत पाहतो ही जाणीव नेहमी कायम ठेवावी. भगवंतापासून मी दूर आहे ही भावनाच मनात आणू नये. भगवंताच्या प्राप्तीकरिता देहाचा सांभाळ करावा. मन रामाकडे गुंतलेले असले म्हणजे देहाचा विसर पडतो. म्हणून नामस्मरणाच्या योगाने मन भगवंताच्या ठिकाणी विलीन करावे. हेच परमार्थाचे सर्व सार आहे.


तात्पर्य: वेदांती ज्याला ‘ब्रह्म’ असे म्हणतात, त्यालाच भक्त ‘नाम’ असे म्हणतात.


Comments
Add Comment

राहू-केतू बदलणार चाल! 25 नोव्हेंबरपासून 'या' चार राशींच्या अडचणी वाढणार; पुढील 18 महिने राहणार आव्हानात्मक

ज्योतिषशास्त्रानुसार, राहु आणि केतु हे पापग्रह असून एकाच वेळी राशीचक्रात गोचर करतात. दोन्ही ग्रह एकमेकांच्या

चातुर्मास संपणार, शुभकार्यांना सुरुवात! देवूठनी एकादशीची तारीख आणि पूजा विधी

Devutthani Ekadashi 2026: कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला 'देवउठनी एकादशी' किंवा 'प्रबोधिनी एकादशी' असे म्हणतात.

Diwali News: चित्रगुप्त पूजेला लेखणीची पूजा का केली जाते? जाणून घ्या

Diwali News: दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर, रोषणाई, दिवे, फटाके, फराळ, नवीन कपडे परिधान करणे याशिवाय दिवाळीतील

Dhanatrayodashi 2026 : धनत्रयोदशीला या 7 वस्तू खरेदी करणे टाळा ! घरात येऊ शकते अशुभता

Dhanatrayodashi 2026 : दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवाची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष

Vasubaras 2026 : दिवाळीच्या पहिल्या सणाचा गोड आणि पवित्र आरंभ; जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त

दिवाळीच्या आनंदोत्सवाची सुरुवात होते ती अतिशय पवित्र अशा 'वसुबारस' या सणाने. 'दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी' असे

Diwali 2026 : दिवाळीत देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर टाळा 'या' 7 चुका !

Diwali 2026 : दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा. हिंदू धर्मातील दिवाळी हा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. दिवाळीत