Shivsena Dasra Melava : शिंदे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी! वाहतूक मार्गात बदल

'असे' असतील पर्यायी मार्ग


मुंबई : विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना शिंदे (Shinde Shivsena) यांचा दसरा मेळावा (Dasra Melava) मुंबईच्या आझाद मैदानात पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा मेळावा असल्याने हा दसरा मेळावा महत्वाचा असणार आहे.


कार्यकर्त्यांकडून या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिंदेसेना दसरा मेळावा दरम्यान होणारी मोठी गर्दी लक्षात घेता वाहतूक मार्गातही मोठे बदल करण्यात आले आहेत.



असे असेल कार्यक्रमाचे नियोजन


शिंदेसेना दसरा मेळाव्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर वीस बाय साठ चा भव्य मुख्य स्टेज बनवण्यात आला आहे. स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या असून पंचवीस हजार खुर्च्यांची आसन व्यवस्था आझाद मैदानात करण्यात आली आहे. तसेच सर्व महत्त्वाच्या नेत्यांसाठी देखील स्टेजवर आसन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आझाद मैदान परिसरामध्ये खाण्यापिण्यासाठी आणि शौचालयासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.


त्याचबरोबर राज्यभरातून येणाऱ्या शिवसैनिकांची वाहनं बेलार्ड पिअर, काला घोडा, मुंबई युनिव्हर्सिटी परिसर, चर्चगेट परिसर आणि सीएसएमटी स्थानकाच्या मागील बाजूस पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.



काय आहेत पर्यायी मार्ग?



  • छत्रपती शिवाजी महाराज चौक (सी.एस.एम.टी. जंक्शन) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन येथील वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज चौक (सी.एस.एम.टी. जंक्शन) डि. एन रोड – एल. टी. मार्ग – वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) अशी वळवण्यात आली आहे.

  • वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (सि.एस. एम. टी जंक्शन ) येथील वाहतूक वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) एल. टी. मार्ग चकाला जंक्शन – उजवे वळण – डी. एन. रोडने सी.एस.एम.टी. अशी वळवण्यात येईल.

  • चाफेकर बंधू चौक (ओ.सी.एस. जंक्शन) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) येथील वाहतूक चाफेकर बंधू चौक (ओ.सी. एस. जंक्शन) उजवे वळण – हुतात्मा चौक – उजवे वळण – रामदेव पोद्दार चौक (सि.टी.आ. जंक्शन)- अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट) उजवे वळण – एम. के. रोड – आनंदीलाल पोद्दार -उजवे वळण वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) मार्ग पुढे इच्छित स्थळी जाता येईल.

  • वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) ते हुतात्मा चौक मार्गावरील वाहतूक वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्श न) – आनंदीलाल पोतदारमार्ग – डावे वळण महर्षि कर्वे रोड – अहिल्याबाई होळकर चौक – डावे वळण – रामदेव पोतदार चौक – वीर नरीमन रोडने पुढे हुतात्मा चौक मार्गे पुढे जाता येईल.

  • चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) ते छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सी. एस एम. टी. जंक्शन) येथील वाहतूक चाफेकर बंधू चौक (ओ.सी.एस. जंक्शन) उजवे वळण हुतात्मा चौक काळा घोडा जंक्शन – रिगल जंक्शन – डावे वळण – एस.बी.एस. रोडने पुढे इच्छित स्थळी जाता येईल.

Comments
Add Comment

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य