पंचगुणांतील पहिला गुण ‘दिशा’

ऋतुराज - ऋतुजा केळकर


कुठल्यातरी क्षुद्र मोहात अडकून यशाच्या पाठी ऊर फुटेपर्यंत धावण्यापेक्षा माणसाने आपले जीवन विशुद्ध विचारांनी भरून टाकावे. सारीच सुगंधित, टवटवीत राहिलेली पुष्प ही कधीतरी कोमेजणारच हे जरी विदारक सत्य असले तरी त्यातील सुगंध मनाच्या गाभाऱ्यात अत्तरासारखा घमघमत राहू दे. त्यांचे सौंदर्य आपल्या आयुष्याच्या... रंगपुष्करणी... इंद्रधनुष्यी पैठणीवर मयुरगोंदणी चैतन्याच्या स्वयंप्रेरीत उद्यमशील नक्षीकामाने जीवनाच्या वाटेवर ध्येयपूर्तीच्या दिशेने कुच करावयास भाग पाडू दे. पण बरेचदा नवे पंख फुटूनही किंवा सुविचारांचे धुमारे धुमसत असतांनाही जीवनाची ध्येयपूर्तीच होत नाही ती अंगात ‘पंचगुणांचा अभाव’ असल्यामुळेच. आता आपण म्हणालं की हे ‘पंचगुण’ तरी कोणते...?


तर सर्वप्रथम आपल्या जीवाला एक ‘दिशा’ असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजे असे पाहा आजकाल पालक आपल्या मुलांना प्रत्येक गोष्टीत प्रवीण करण्याचा प्रयत्न करतात. मान्य आहे त्याचा फायदा त्यांना त्यांच्या पायावर सज्जडपणे उभे रहाण्यास होतोच होतो. पण जेव्हा एका विशिष्ट क्षणी त्यांना, “आता... यापुढे मी नक्की काय करू? “ हे ठरवण्याची वेळ येते तेव्हा त्यांना नक्की कळतच नाही की, आपण कुठल्या दिशेने जायला पाहिजे. काही काही मुलांना तर सारे काही थोडं थोडं येतंय पण प्राविण्य असे एकातही नाही असे असते. मग अखेरीस आपला कल... आपली आवड... जपण्याऐवजी त्यांना जीवनाच्या निर्मितीच्या त्याक्षणी कुठल्या तरी सबबीमुळे म्हणा किंवा लाचारीच्या तडजोडींमुळे म्हणा किंवा आर्थिक फटी - उणिवा बुजवण्याकरिता म्हणा चुकीची वाट निवडावी लागते अन् मग आयुष्य हरवलेल्या श्रीकृष्णाच्या बासरी सारखे अपयशाच्या सुर्याच्या दाहकतेत जीवनाचे सुमधुर संगीत हरवून बसतं आणि मग सरतेशेवटी आयुष्यभर अखंडपणे अविरत सगळ्यांच्या अपेक्षांच्या मृगतृष्णेत पिचून अखेरीस जेव्हा अंतिम क्षणी संवेदनाहीन होऊन अंथरुणावर लोळागोळा झालेला त्यांचा देह आपल्या अस्तित्वाचा डोलारा हरवून गलितगात्र होऊन पडतो तेव्हा जाणवते की, ‘उदी आणि राख’ यात काय फरक आहे तो. तेव्हा जाणवते की, दिशाहीन झाल्यावर होणारा आयुष्याचा पर्णपाचोळा... जाणवते की आत्म्याची... कर्मयोगाची हाक न ऐकल्याने हरवलेल्या हिरवेपणाची सहिष्णूता... प्रत्येक वळणावर परिस्थिती आणि जबाबदाऱ्या यांच्या हट्टी निग्रही धुक्यात आपले हरवणे... दिशाहीनपणे ... म्हणूनच आपल्या आयुष्याची दिशा ठरवताना खुप ‘डोळसपणा’ गरजेचा आहे.


एकदा का दिशा ठरली की, मग त्या पर्यंत पोहचण्याची जिद्द मनात ठासून भरणे गरजेचे आहे. ससा आणि कासवाच्या साध्या गोष्टीतच पहा ना... ससा हिरवगार लुसलुशीत गवत पोटभर खाऊन आणि झऱ्याचे झुळझुळते पाणी पिऊन, गर्द हिरव्या झाडीत गाढ झोपी गेला... पण कासव मात्र ... ध्येयासक्तीने... यशाच्या दिशेने हळूहळू सरकतच राहिला म्हणूनच तर कासवालाच यश मिळाले. म्हणजेच परिश्रम आणि आत्मविश्वास अत्यंत गरजेचे आहे. म्हणजेच परिश्रमाने यश मिळवण्यासाठी गरजेचे आहे ते स्वतः तील प्राविण्याबरोबरच आपल्यातील वैगुण्ये तसेच तृटी देखील आपल्याला ज्ञात असणे गरजेचे आहे.


आणि मग असे झाले तर पश्चात्तापाच्या कळवळ्यात नव्या बिज बाहुल्यांची रोवणी ही आपोआपच होते नाही का? कसे आहे ना की, इंद्रायणी असो अगर कोपऱ्यावरील गटारगंगा दोन्हींचीही अखेर ही सागरातच होते फक्त फरक अस्तित्वाचाच नव्हे तर पायसतेचा आहे की जो ज्याचा त्यानेच शोधायचा असतो.

Comments
Add Comment

Pitru Paksha 2026: पितृपक्षात कोणत्या गोष्टी टाळाव्यात, पंधरवड्यात काय काळजी घ्यावी? जाणून घ्या

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष हा आपल्या पितरांसाठी समर्पित आहे. या 15 दिवसांच्या कालावधीत आल्या प्रियजनांच्या

Ganesh Visarjan 2026 : आज अनंत चतुर्दशी ! बाप्पाला निरोप देण्यापूर्वी जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि विसर्जनाची पद्धत

Ganesh Visarjan 2026 : आज, 25 सप्टेंबर रोजी देशभरात गणेशोत्सवाची सांगता होत असून, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या

Radha Ashtami : सुख, शांती आणि समृद्धीसाठी राधा अष्टमीची पूजा कशी करावी? वाचा टप्प्याटप्प्याने संपूर्ण विधी

राधाष्टमीनिमित्त बरसाणामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. शनिवारी वृषभानू नंदिनी राधाराणी यांची जयंती

Difference Between Guru Purnima and Teachers Day : गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिन यांच्यातील मुख्य फरक अन् महत्त्व काय ? जाणून घ्या एका क्लिकवर

आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवण्यात, उत्तम संस्कार करण्यात आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देण्यात

Shravan Putrada Ekadashi 2026 : श्रावण पुत्रदा एकादशी 23 ऑगस्टला; जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व

Shravan Putrada Ekadashi : श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ‘श्रावण पुत्रदा एकादशी’ किंवा ‘पवित्रा एकादशी’ असे

Babulnath Temple : मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी!

मुंबई : पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी (३ ऑगस्ट २०२६) संपूर्ण मुंबई शहर शिवभक्तीत चिंब भिजल्याचे