IFFI 2024 : इफ्फी महोत्सवात मराठी सिनेमा, वेब सिरीजचा डंका

पणजी : 'घरत गणपती', 'लंपन'सह अनेक मराठी कलाकृतींचे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गोव्यात संपन्न झालेल्या यंदाच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये (इफ्फी) मध्ये रेड कार्पेटवरील तारे-तारकांची उपस्थित, विविध भाषांमधील चित्रपट, वेब सीरिज मास्टरक्लास अशा अनेक गोष्टींनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. पुरस्कार वितरण सोहळ्याने या महोत्सवाची सांगता झाली. विविध श्रेणीतील उत्कृष्ट कलाकृती, कलाकार आणि तंत्रज्ञांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये अनेक मराठी कलाकृतींचादेखील समावेश होता.


दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर या तरुण दिग्दर्शकाला 'घरत गणपती' या त्याच्या चित्रपटासाठी पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारानंतर नवज्योत सिनेविश्वातील नव्या दमाचा प्रतिभावान दिग्दर्शक आहे; असा सूर महोत्सवात उमटला. युवा प्रतिभावंतांच्या योगदानाची दखल घेत देशभरात चित्रपट निर्मिती करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं यंदाच्या इफ्फीमध्ये भारतीय चित्रपटासाठीचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार सुरू केला आहे. परंपरा आणि आधुनिक भावनांना जोडणाऱ्या हृदयस्पर्शी कथेचं सादरीकरण यासाठी परीक्षकांनी नवज्योतची प्रशंसा केली. दुसरीकडे 'लंपन'ला सर्वोत्कृष्ट वेब सीरिज (ओटीटी) हा पुरस्कार मिळाला आहे. उल्लेखनीय कथाकथन, उच्च निर्मितीमूल्यं आणि उत्कृष्ट कामगिरी यासाठी या वेब सीरिजला पुरस्कार प्राप्त झाला. ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश नारायण संत यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'लंपन' ही एका स्वप्नाळू मुलाची कथा आहे. ओटीटीविश्वातील नावीन्यपूर्ण कामाला प्रोत्साहन देण्यासाठी दिला जाणारा पुरस्कार यंदा 'लंपन' या सीरिजने पटकावला.







'घरत गणपती', 'लंपन' कलाकृतींसह महोत्सवात शशी खंदारे याचा 'जिप्सी', निखिल महाजन दिग्दर्शित 'रावसाहेब' तर पंकज सोनवणे याचा 'प्राणप्रतिष्ठा' हा मराठी आणि शिवम हरमळकर- संतोष शेटकर यांचा 'सावट' हा कोकणी माहितीपट अशा अनेक कलाकृती प्रदर्शित झाल्या. त्याचप्रमाणे हृषिकेश गुप्ते दिग्दर्शित 'हजारवेळा शोले पाहिलेला, माणूस' हा सिनेमादेखील महोत्सवात दाखवला गेला. महोत्सवाच्या 'फिल्म बाजार' या विभागात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 'छबिला', 'विषय हार्ड', 'तेरव', 'आत्मपॅम्प्लेट' यांसारखे मराठी सिनेमेही सहभागी झाले होते.


Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी