गेटवे ऑफ इंडियाजवळील बोट दुर्घटनेत मृतांचा आकडा १३वर

मुंबई: मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने जाणारी प्रवासी बोट उलटल्याने बुधवारी मोठी दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने टक्कर दिली. यामुळे ही दुर्घटना घडली. याचा व्हिडिओही समोर आला आहे. यात नौदलाच्या ३ जवानांसह १३ जणांचा मृत्यू झाला.



एलिफंटाच्या दिशेने जात होती बोट


ही घटना बुधवारी संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली. एलिफंटाच्या दिशेने ही नीलकमल बोट जात होती. यावेळी उरण, करंजाजवळ नौदलाच्या स्पीड बोटची धडक बसल्याने ही बोट पलटली. या बोटीमध्ये साधारण ११०हून अधिक जण होते. मिळालेल्या माहितीनुसार अधिकाधिक लोकांना वाचवण्यात आले आहे तर १३ जणांचा यात मृत्यू झाला. तर पाच जण गंभीररित्या जखमी झालेत.





यासंदर्भातील माहितीनुसार, उरण, कारंजाजवळ 'नीलकमल' ही फेरीबोट उलटली. नौदल, तटरक्षक दल, यलोगेट पोलिस स्टेशन आणि स्थानिक मासेमारी नौकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त बोटीमधील १०१ प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. तर या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झालाय. गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाकडे जाण्यासाठी भाऊच्या धक्क्यावरुन नीलकमल नावाची बोट निघाली होती. यावेळी समुद्रातून दुसऱ्या बाजूने एक स्पीडबोट जात होती. यावेळी त्या स्पीडबोटचे नियंत्रण सुटल्याने ती बोट सरळ फेरीच्या बोटीवर येऊन जोरात आदळली. त्यामुळे फेरीची बोट बुडाली. या घटनेचा व्हिडीओ सद्धा व्हायरल होत आहे.

या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुक्रम विधानसभा आणि विधान परिषदेत माहिती दिली

मुख्यमंत्र्‍यांकडून मदतीची घोषणा


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताप्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्‍यांनी या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियासाठी प्रत्येकी पाच लाख रूपये मदतीची घोषणा केली आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने