Tadoba Tiger : ताडोबात आणखी दोन वाघांना लावले ‘रेडिओ कॉलर’

चंद्रपूर: ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये आणखी दोन अवयस्क नर वाघांना ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आले आहे. परिणामी त्यामुळे एका आठवड्यात कॉलर केलेल्या वाघांची संख्या चार झाली आहे. वाघांचे विखुरणे, ‘कॉरिडॉरचे मॅपिंग’ आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे याचा अभ्यास करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. दरम्यान प्रकल्पांतर्गत येत्या काही महिन्यांत आणखी १० वाघांना रेडिओ कॉलर केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘रॅपिड रेस्क्यू टीम’ आणि डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थान (डब्लूआयआय) च्या संयुक्त विद्यमाने मुल (बफर) अंतर्गत केसलाघाट जंगलात केलेल्या संयुक्त कारवाईत रविवारी वाघिणीचे दोन नर शावक टी-२९ (के -निशाण) रेडिओ कॉलर केले गेले. आता जे जंगलात विखुरण्यासाठी तयार आहेत, अश्या दोन्ही ‘कॉलर’ केलेले वाघ अवयस्क नर आहेत.. याआधी टी-२९ वाघिणीचे शावक आणि टी-१६२ चे दुसरे शावक यांना बुधवारी अशाच संयुक्त ऑपरेशनमध्ये ‘रेडिओ कॉलर’ केले गेले होते.




ताडोबा अंतर्गत जवळजवळ सर्व भाग मोठ्या संख्येन वाघांनी आधीच व्यापलेला असल्याने, कॉलर केलेले शावक प्रकल्पातून बाहेर पडण्याची आणि आजूबाजूच्या जंगलात जाण्याची शक्यता जास्त आहे. या वाघांच्या हालचालींचा मागोवा घेतल्याने केवळ त्यांच्या विखुरण्याच्या पद्धतींचा अभ्यास करण्यात मदत होणार नाही, तर वन्यजीव, कॉरिडॉरचे मॅपिंग करण्यात आणि मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यात मदत होईल असे सूत्रांचे म्हणणे आहे.

सदर उपक्रम ‘लॉन्ग टर्म मॉनिटरिंग ऑफ टायगर्स’, ‘को-प्रिडेटर्स’ आणि’ प्रे स्पीसीज इन टीएटीआर ॲण्ड ॲण्डजाईनिंग लँडस्केप्स’ या चालू संशोधन प्रकल्पाचा एक भाग आहे. हा राज्य सरकारच्या मान्यतेने २०१४ पासून सुरु आहे. प्रकल्पातील पुढील प्रगती अतिरिक्त ‘रेडिओ कॉलर’ खरेदी करण्यावर अवलंबून आहे. आंतरराष्ट्रीय पुरवठादारांकडून प्राप्त केले जातात. ताडोबा निरीक्षण आणि संशोधन प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी लवकरच आणखी १० कॉलरसाठी ‘ऑर्डर’ देण्याची योजना आखली असल्याची माहिती समोर आली आहे

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा