Nagpur Accident : चंद्रपूर-नागपूर मार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

चंद्रपूर : नागपूर - चंद्रपूर मार्गावर नातेवाईकांची भेट घेऊन परतत असतांना समोरून येणार्‍या ट्रकवर दुचाकी आदळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.नागपूर - चंद्रपूर मार्गावरील डाली पेट्रोलपंप समोर सतीश भाऊराव नागपुरे (५१), मंजुषा सतीश नागपुरे (४७) व माहिरा राहुल नागपुरे अशी मृतकांची नावे आहे. तर स्मायली कामतवार ही सात वर्षीय मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.



वणी तालुक्यातील रासाघोणसा येथील नागपुरे कुटुंब भद्रावती येथे नातेवाईकाकडे भेटीसाठी आले होते. भद्रावती शहरालगत नातेवाईकाच्या मालकीच्या हॉटेलमधे जेवण केल्यानंतर नागपुरे कुटुंब या दुचाकीने आपल्या नातेवाईकाच्या घराकडे परत जात असताना हायवेवर यू टर्न घेताना समोरून येणार्‍या या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात मंजुषा सतीश नागपुरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सतीश भाऊराव नागपुरे व माहिरा राहुल नागपुरे या दोन वर्षीय बालिकेचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. या अपघातात स्मायली कामतवार ही सात वर्षीय मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.अपघाताच्या या घटनेनंतर ट्रक चालक नंदू चव्हाण रा.पुसद याला भद्रावती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी