Mumbai Rani Baug : राणी बागेतील झाडे एका क्लिकवर पाहता येणार!

देश-विदेशातील झाडांच्या प्रसारासाठी बनवणार रिल्स


मुंबई (मानसी खांबे) : पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या भायखळा येथील राणीच्या बागेत (Mumbai Rani Baug) देशासह परदेशी वाणाची (Foreign Tree) अनेक ऐतिहासिक झाडे थाटात उभी आहेत. या विविध प्रजातींच्या झाडांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या झाडांवर रिल्स बनवण्याचा निर्णय राणी बागेतील प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे महाकाय, दुर्मिळ झाडांचा हा ठेवा आता पर्यटकांना घरबसल्या एका क्लिकवर पाहता येणार आहेत.



भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली असली तरी इंग्रजकालीन काही आठवणी आजही थाटात उभ्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे इंग्रजांनी लावलेली राणीच्या बागेतील (Mumbai Rani Baug) विदेशी झाडे होय. दूरदृष्टीचा विचार करून इंग्रजांनी लावलेली ही झाडे महाकाय असून मुंबईच्या पर्यावरणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सध्या राणीच्या बागेत ६ खंडांतील विविध प्रकारची झाडे आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया या खंडांतील झाडांचा समावेश आहे. खाया, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, चेंडूफुल, ब्राझिलियन आयनवूड, कडल ट्री, कैलासपती, चायनीज फॅन पाम, कोको ट्री, कॉलविल्स, ग्लोरी, कॉर्कस्क्रू फ्लॉवर, दिवी दिवी, कांडोळ - इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, भारत, गेस्ट ट्री, सफेदा, मॅजेस्टिक हेवन लोटस, लाल झुंबर - जमैका, व्हेनेझुएला अशा अनेक परदेशी वाणाच्या झाडांचे रोपण ब्रिटिशांनी भारतात केले होते. तब्बल १६२ वर्षांपासून राणीच्या बागेत असणारी ही झाडे आजही टवटवीत आहेत.


या झाडांसाठी कोणत्याही प्रकारची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. वेळोवेळी पाणी आणि राणीच्या बागेत तयार होणारा पालापाचोळा, शेणखत व गांडूळ यांच्यापासून तयार होणारे खत या झाडांना घातले जाते. तसेच जुनी झाडे असल्यामुळे वाळवी लागली असल्यास त्यावर कीटकनाशके वापरली जातात. दरम्यान, पूर्वीपासूनच या झाडांचे संगोपन चांगले झाल्यामुळे आजही ही झाडे राणीच्या बागेत थाटात उभी असल्याचे जीवशास्त्रज्ञ व शिक्षण नि जनसंपर्क अधिकारी डॉ. अभिषेक साटम यांनी संगितले.



हरितसंपदेची माहिती देण्यासाठी रिल्स


राणीच्या बागेत लागवड केलेली सर्व देशी आणि विदेशी झाडांची माहिती लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी राणीबाग प्रशासनाने रील्स व्हिडिओ तयार करण्याची योजना आखली आहे. याचे नाव 'हरितसंपदेविषयी माहिती देणारे कलरफुल सीरिज' असून यामध्ये बागेतील सर्व प्रकारच्या झाडांचा बहरण्याचा काळ दाखवणार आहोत. तसेच राणीच्या बागेत हे झाड कोणत्या ठिकाणी आहे म्हणजेच त्याचे लोकेशन देखील देण्यात येणार आहे. सध्या यावर काम सुरू असून लवकरच हे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. दरमहा ४ ते ५ व्हिडिओ पोस्ट करण्याचा राणी बाग प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे डॉ. अभिषेक साटम यांनी सांगितले.



अमेरिकन रेन ट्री घेतेय लक्ष वेधून


राणीच्या बागेत ब्रिटिशांनी लावलेले एका अवाढव्य स्वरूपातील अमेरिकन झाड आजही तोऱ्यात उभे आहे. जलद गतीने वाढणारे, इतर छोट्या झाडांना सावली देणारे आणि भलेमोठे खोड असणारे हे वृक्ष आहे. मोठ्या छत्रीसारखा शाखाविस्तार असलेल्या या वृक्षाच्या पानांवर अनेक कीटकनाशके असून एकत्रित विष्ठाविसर्जनामुळे या झाडाखाली कित्येकदा पाण्याचे थेंब पडल्याचा भास होतो. त्यामुळे या झाडाला रेन ट्री नाव दिले आहे. या झाडाला 'बेस्ट ट्री ऑफ मुंबई' हा पुरस्कार देखील मिळाला आहे.



काय आहे इतिहास?


भारतीय बागायतदारांना स्वावलंबी बनविण्याचा उद्देशाने १८४२ साली अग्रिकल्चरल अँड होरटीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाच्या सभासदांनी शिवडीमध्ये वनस्पती बाग उभारली. मात्र ही जागा मुख्य शहरापासून दूर असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या लोकांची संख्या घटत होती. त्यामुळे परदेशी वाणांची झाडे लोकांच्या निदर्शनास येण्यासाठी ही झाडे राणीच्या बागेत स्थलांतरित करण्यात आली. (Mumbai Rani Baug)

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने