'उद्धव ठाकरे सोयीनुसार हिंदुत्वाचा मुखवटा लावतात'

मुंबई : उद्धव ठाकरे त्यांच्या सोयीनुसार हिंदुत्वाचा मुखवटा लावतात. त्यांचा विकासाशी काहीही संबंध नाही; अशी टीका भाजपाच्या विधान परिषदेतील आमदार चित्रा वाघ यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी २३ जानेवारी रोजी मुंबईत एक सभा घेतली. या सभेत केलेल्या वक्तव्यांचा चित्रा वाघ यांनी समाचार घेतला.



औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना अचानक हिंदुत्व आठवले… ते हवं तेव्हा हिंदुत्वाचा मुखवटा लावतात आणि एरवी तो खुंटीवर टांगून ठेवतात... लांगूलचालन करत उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या मान्य करताना कुठे गेले होते उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व ? पाकिस्तानी झेंडे डोळ्यासमोर नाचवले गेले तेव्हा कुठे गेले होते उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व ? व्होट जिहाद करताना ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर मशीद उभारण्यापर्यंत घोषणा करताना कुठे गेले होते उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व ? वक्फ बोर्डाच्या मुद्यावर बोलणे टाळायचे आणि जनतेने विरोधात कौल दिला की तो अमान्य करायचा ही उद्धव ठाकरेंची जुनीच खोड आहे. आता उद्धव ठाकरेंना सूड घ्यायचा आहे... कोणाचा ? जनतेचा ? वारंवार गद्दार - खंजीर सारखी भाषणं करणं आणि रोज सकाळी माध्यमांवर तुमच्या भोंग्याला सोडणं हा जनतेवर उगवला जाणारा सूडच आहे. बाकी विकास आणि प्रत्यक्ष काम याचा आणि उद्धव ठाकरेंचा काहीही संबध नाही हे जनता देखील जाणते; या शब्दात आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.



याआधी मंत्री आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंच्या सभेतील भाषणाचा समाचार घेतला. उबाठाच्या मेंदूतच झोल आहे, असे आशिष शेलार म्हणाले. उद्धव ठाकरेंचा जन्म २७ जुलै १९६० रोजी झाला आणि जनसंघाची स्थापना १९५१ मध्ये झाली. नंतर दिल्लीत जनसंघाच्या नेत्यांची बैठक झाली आणि नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला. ही बैठक पाच आणि सहा एप्रिल १९६० रोजी झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे जेमतेम वीस वर्षांचे होते. फोटोग्राफी करण्यात दंग असलेल्या उद्धव ठाकरेंनी जनसंघ, भाजपा आणि १०० वर्षे पूर्ण करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी बोलण्याला काही अर्थ आहे का ?... पंतप्रधान मोदींनी जगात भारताचा बहुमान वाढवला तर अमित शाह यांनी भाजपाला जगातील सर्वात मोठा आणि सक्षम पक्ष केले. यामुळे उद्धव ठाकरेंनी मोदी आणि अमित शाह याविषयावर बोलण्यालाही अर्थ नाही.



महापालिकेत उद्धव ठाकरेंची सत्ता होती त्यावेळी मुंबईत महापूर आला. मुंबई २६ जुलैच्या महापुरात बुडली होती आणि बाळासाहेब ठाकरे अडचणीत सापडले होते त्यावेळी उद्धव ठाकरे मिठी नदीच्या पुराला पाठ दाखवून पंचतारांकीत हॉटेलमध्ये पळून गेले. कंत्राटदारांकडून कमिशन खाऊन त्यांनी मुंबईचा बट्ट्याबोळ केला आहे; या शब्दात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता