जेथे नाम तेथे परमात्मा आहेच।

ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


तुम्ही सर्व भाविकजन। ऐकावे माझे वचन॥ माझे भेटी सदा राहावे। मुखाने रामनाम घ्यावे॥ जो नामात राहिला। तो अखंड माझ्या दर्शनात बसला॥ जेथे नामाचे स्मरण। ते माझे वसतिस्थान॥ जेथे रामाचे नाव। तेथे माझा ठाव। हे आणून चित्ती। सुखे राहावे प्रपंचाप्रति॥ नामात ठेवा मन। हेच माझे खरे दर्शन॥ नेहमी रामाचा ध्यास। हाच माझा सहवास॥ तुम्ही सुज्ञ माझे प्राण। नाम करा तेवढे जतन॥ नामात ठेवावे प्रेम। तेथे माझी वसति जाण॥ ज्याने ज्याने इच्छा धरावी व्हावे माझे। त्याने नाम कधी न सोडावे वाचे॥ एवढे देईल जो नामदान। त्याला अर्पण करून घेईन जाण॥ जेथे नाम। तेथे माझे धाम॥ नामापरते न मानी सुख। तेथेच माझे राहणे देख। तुम्ही शक्य तितके राहावे नामात। हेच माझे सांगणे तुम्हांस॥ शक्य तो नामस्मरण करावे। म्हणजे मी तुमचेजवळ अखंड आहे असे समजावे॥ जेथे परमात्म्याचे नाव। तेथे माझा आहे ठाव॥ जेथे नाम तेथेच मी। हा भरवसा बाळगून असावे तुम्ही॥


नाही केले वेदपठण । शास्त्राचे नाही झाले ज्ञान। श्रुतिस्मृति उपनिषदे यांची नाही ओळखण। असा मी अज्ञान जाण ॥ तरी एक भजावे रघुनाथासी। अर्पण होऊन जावे त्यासी। ऐसे जाणून चित्ती। खंड नाही समाधानवृत्ति॥ मी सतत आहे तुमच्यापाशी हा ठेवा निर्धार। न सोडावा आता धीर॥ ठेवावा एक विश्वास। मी आहे तुम्हाजवळ खास॥ श्रीदासबोध नामस्मरण। याचे असावे वाचन। मी त्यातच मानावे जाण। कृपा करील रघुनंदन॥ मी तेथे आहे हे नक्की समजावे। राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे॥ उपाधिरहित मी तुमचेजवळ सतत आहे॥ मी नाही अशी कल्पना करू नये। तुमचे जवळ आहे हे खात्रीने समजावे॥ मी नाही सोडून गेलो कोणाला दूर। माझी वसति तुमच्या शेजारी जाण॥ माझे येणे जाणे तुमचे हाती। तुम्हा सर्वांहून नाही परती ॥ रामपरता मी । जैसा प्राणापरता देह जाण॥ सदा सर्वकाळ माझ्याशी वास। हाच धरावा हव्यास॥ त्याला न जावे लागे कोठे। घरबसल्या राम भेटे॥ जे जे करणे आणिले मनी। रामकृपे पावलो जनी॥ आता पाहा मला रामात । आनंद मानावा नामात॥ सर्वांनी राखावे समाधान । जे माझे प्राणाहून प्राण जाण॥ माझे ऐकावे सर्वांनी ।
सदा राहावे समाधानी॥


तात्पर्य : जेथे नामाचे प्रेम। तेथेच मी सतत जाण॥

Comments
Add Comment

Diwali News: चित्रगुप्त पूजेला लेखणीची पूजा का केली जाते? जाणून घ्या

Diwali News: दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर, रोषणाई, दिवे, फटाके, फराळ, नवीन कपडे परिधान करणे याशिवाय दिवाळीतील

Dhanatrayodashi 2026 : धनत्रयोदशीला या 7 वस्तू खरेदी करणे टाळा ! घरात येऊ शकते अशुभता

Dhanatrayodashi 2026 : दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवाची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष

Vasubaras 2026 : दिवाळीच्या पहिल्या सणाचा गोड आणि पवित्र आरंभ; जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त

दिवाळीच्या आनंदोत्सवाची सुरुवात होते ती अतिशय पवित्र अशा 'वसुबारस' या सणाने. 'दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी' असे

Diwali 2026 : दिवाळीत देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर टाळा 'या' 7 चुका !

Diwali 2026 : दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा. हिंदू धर्मातील दिवाळी हा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. दिवाळीत

Diwali 2026 : घरात होईल सुख-समृद्धीचे आगमन, दिवाळीत करा हे 6 पारंपरिक उपाय

Diwali 2026 : घरात सकारात्मक वातावरण आणि सुख-शांती टिकून राहावी, यासाठी भारतीय संस्कृतीत अनेक पारंपरिक प्रथा सांगितल्या

Diwali 2026 : दिवाळी 8 की 9 नोव्हेंबरला ? जाणून घ्या लक्ष्मीपूजेची तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेची संपूर्ण विधी

Diwali 2026 Date and Laxmi Puja Muhurat : दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मी आणि