Out Of India Valentine Day Celebration : भारताबाहेर कसा साजरा केला जातो व्हॅलेंटाईन डे ? जाणून घ्या

मुंबई : प्रेमाचा महिना म्हणून ओळखल्या जाणारा फेब्रुवारी महिना प्रत्येक प्रेम करू पाहणाऱ्या आणि करणाऱ्या प्रेमींसाठी महत्त्वाचा असतो. ७ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या व्हॅलेंटाईन वीकचा तरुणाईमध्ये वेगळाच उत्साह असतो. मात्र प्रत्येक देशात व्हॅलेंटाईन वीक वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. भारतामध्ये प्रियकर - प्रेयसीला तर प्रेयसी - प्रियकराला आठवडाभर विविध भेटवस्तू देऊन व्हॅलेंटाईन वीक साजरा करतात. कितीही म्हटलं प्रेम करायचा असा कोणता ठराविक दिवस नसतो तरी या दिवसाची प्रेमीयुगुल आतुरतेने वाट पहात असतात.



भारताचा मित्र देश मानल्या जाणाऱ्या अमेरिकेत कँडी हार्ट चॉकलेट देऊन एकमेकांप्रती असलेल्या भावना व्यक्त करतात. तसेच जपानमध्ये व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी महिला पुरुषांना चॉकलेट देतात. जपानमध्ये १९५० पासून या प्रथेचा पायंडा पडला आहे. नंतर एक महिन्याने तिथे व्हाईट डे साजरा केला जातो जेव्हा पुरुष महिलांना काही भेटवस्तू देतात. त्याच्या उलट दक्षिण कोरिया मध्ये ब्लॅक अँड व्हाईट डे साजरा केला जातो.



दक्षिण कोरियात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनडेच्या दिवशी प्रेयसी प्रियकराला चॉकलेट देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. त्या निमित्ताने तेथील मुली पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतात तर कोणत्याही प्रेमाच्या नात्यात न अडकलेली मुलं काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. फिनलँड सारख्या देशात व्हॅलेंटाईन डे हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. येथे मित्रमंडळींना शुभेच्छा देतात. एकमेकांना भेटवस्तू पाठवतात. या दिवसाचा उद्देश केवळ प्रियकर आणि प्रेयसी मधील नातेसंबंध नव्हे तर सर्व प्रकारचे नाते दृढ करणे हा आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि