Chava Online Update : विकी कौशलचा 'छावा' ऑनलाईन लीक

मुंबई : मनोरंजन क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमाला पायरसीचा फटका बसला आहे. संभाजी महाराजांच्या जीवनकथेवर आधारित असणाऱ्या छावा सिनेमाला पहिल्याच दिवशी भरभरून प्रेम मिळालं. मात्र पायरसीमुळे छावा सिनेमा अडचणीत सापडू येऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.



'छावा' हा हिंदी चित्रपट शुक्रवार १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. पण प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाची पहिल्या दिवसाची तिकिटे विकली गेली होती. चित्रपटाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट तब्बल १३० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी याची बॉक्स ऑफिसवर २.३५ कोटींची कमाई झाली. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना तसेच औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना पाहायला मिळत आहेत.


मात्र हा चित्रपट आता ऑनलाईन लीक झाला आहे. 'छावा'च्या रिलीजनंतर अवघ्या काही तासांत 'छावा' ऑनलाइन लीक झाला आहे. अनेक पायरसी वेबसाइटवर 'छावा' चित्रपट अपलोड करण्यात आला आहे. ज्यामुळे काही प्रमाणात निर्मात्यांना फटका बसला आहे. छावा मूव्ही डाउनलोड आणि छावा फ्री एचडीसारखे कीवर्ड देखील ट्रेंडिंग आहेत. या पायरसीमुळे छावा सिनेमाची कमाई मंदावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्म बघायला मिळणार 'छावा' ?


व्हॅलेंटाईनच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर डरकाळी फोडली. सलग दोन दिवस 'छावा' ने ५० कोटींची कमाई करत तब्बल ८ चित्रपटांना मागे टाकलं आहे. अशातच 'छावा'च्या रिलीजनंतर अवघ्या काही तासांत 'छावा' ऑनलाइन लीक झाला. नेटफ्लिक्सने चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स खरेदी केले आहेत. 'छावा' तीन ते चार महिन्यांनंतर घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे. मात्र अद्याप निर्मात्यांनी ओटीटी रिलीजच्या डेटची कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने