Chembur News : मोटारगाडीवर क्रेन कोसळली !

मुंबई  : चेंबूरमधील सुभाष नगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या एक मोटारगाडी आणि एका दुचाकीवर क्रेन कोसळली. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. गेल्या काही वर्षांपासून चेंबूरच्या सुभाष नगर परिसरात मोठ्या प्रमाणात इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. पुनर्विकासस्थळी क्रेनच्या माध्यमातून विविध कामे करण्यात येत आहेत.



येथील इमारत क्रमांक ३५ जवळ शुक्रवारी सायंकाळी ट्रकमधील लोखंडी सळ्या क्रेनने उतरवण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक क्रेन कोसळली आणि जवळच उभ्या असलेली एक मोटारगाडी आणि दुचाकीवर पडली. सुदैवाने यावेळी मोटारगाडीत कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र अपघातात मोटारगाडी आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच गोवंडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेची नोंद केली आहे.
Comments
Add Comment

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

BMC Water Pipeline Leakage : पाणी गळती दुरुस्तीच्या कामांसाठी घाटकोपरला २७ कोटींचा ‘बूस्टर’!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर भागातील जलवाहिनीतून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या जल

Kandivali : स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन बस अपघातातील जखमी युवकावर कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात उपचारास नकार!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मालाड – मार्वे रोड, स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन येथे झालेल्या भीषण बस अपघातात २१

Kandivali : कांदिवलीतील डॉ.बाबासाहेब रुग्णालयातील साहित्य खरेदीत गैरव्यवहार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या कांदिवलीतील (Kandivali) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापालिका

BMC : घाटकोपर, मानखुर्द चेंबूर परिसरातील ०६ अनधिकृत लॉजवर जप्तीची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अनधिकृत व्यवसाय आणि नियमबाह्य बांधकामांविरोधात महानगरपालिकेकडून कारवाई सुरू आहे. या

मुंबईत ५१ दिवसांमध्ये १६,१५३ बॅनरांची फाडाफाडी

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या बॅनरबाजांवर महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात असून