Jitendra Awhad : नकलाकार जितेंद्र आव्हाड यांचा स्टंटबाजी करणे हा स्थायीभाव

Jitendra Awhad : विधानभवनात नौटंकी करण्याऐवजी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या खासदारांनी लोकसभेच्या अधिवेशनात परराष्ट्र मंत्र्यांसमोर निषेध नोंदवावा - आनंद परांजपे



मुंबई : जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी परराष्ट्र धोरणावर राज्याच्या विधानभवनात नौटंकी करण्याऐवजी लोकसभेच्या अधिवेशनात त्यांच्या खासदारांनी परराष्ट्र मंत्र्यांसमोर बेड्या घालून निदर्शने करावी, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी लगावला आहे.


दरम्यान नकलाकार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा स्टंटबाजी करणे हा स्थायीभाव आहे. असा थेट हल्लाबोल आनंद परांजपे यांनी केला आहे.


लोकशाहीत आमचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विधानभवन परिसरात बेड्या घालून प्रवेश केला. याबाबतची बाईट पाहिली परंतु हाच मिडिया रोज विविध विषयांवर ठाणे येथे बंगल्यावर असो किंवा पक्ष कार्यालयात असो सातत्याने या सरकारच्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड ज्या - ज्या प्रतिक्रिया व्यक्त करतात या सर्वांना माध्यमे कव्हरेज देतात मग आवाज कसा दाबला जातो, असा सवालही आनंद परांजपे यांनी उपस्थित केला आहे.



लोकशाहीत विरोधकांनी आपली सकारात्मक भूमिका मांडली पाहिजे. आणि नेहमी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) मांडत असतात. पण आज मी काहीतरी स्टंट केला पाहिजे, काहीतरी मी वेगळा आहे हे दाखवले पाहिजे म्हणून हा खटाटोप होता. मात्र दुर्दैवं असे की, ही स्टंटबाजी करताना त्यांच्या पक्षाचा एक आमदारही सोबत नव्हता, असा खोचक टोलाही आनंद परांजपे यांनी लगावला.


अमेरिकेहून भारतीय नागरिक पुन्हा भारतात पाठवले गेले. त्यांच्या हातात बेड्या होत्या. खरंतर देशाचे परराष्ट्र धोरण हे ना महाराष्ट्राच्या विधानभवनात, ना विधानपरिषदेत ठरते तर ते ठरते देशाच्या लोकसभेत आणि राज्यसभेत याची आठवण करून देताना आनंद परांजपे यांनी अमेरिकेतून भारतीयांना परत पाठवण्यात आले याचा निषेध करायचा असेल तर लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन दुसर्‍या सत्रात सुरू होईल तेव्हा खासदारांनी बेड्या घालून निषेध नोंदवावा, असेही आनंद परांजपे म्हणाले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने