Chikhaldara Village : चिखलदऱ्याच्या लवादा गावात घराला आग

अमरावती : कडक उन्हाळा सुरू झाल्याने मेळघाटातील विविध भागात आगीच्या घटना लागत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली - आहे. धारणी सोल प्रोजेक्टसह चार्कदा गावात लागलेलया आगीच्या घटनेची ओरड शांत होत नाही तोच आता... चिखलदरा तालुक्यातील लवादा गावात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एका आदिवासीच्या घरातील धुऱ्याला आग लागली. परंतु, चिखलदरा नपंच्या अग्निशमण विभागाचे वाहन ३० मिनिटे उशिरा आल्याने आदिवासी गावकऱ्यांनी आपआपल्या घरात साठविलेले पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळविले. अन्यथा अर्ध्या पेक्षा जास्त गावातील घरे आगीच्या विळख्यात आली असती लवादा गावातील दत्तुजी रामजी येवले (५५) हे त्यांच्या घरातील पाळीव पशूसाठी गावालगतच्या शिवारात चाराआणण्यासाठी गेले होते अशातच अचानक त्यांच्या घरातील धुऱ्याला आग लागल्याने गावात एकच खळबळ उडाली. याबाबत कळताच दत्तजी येवले तातडीने घरी धावत आले.



गावातील काही लोकांनी चिखलदरा अग्निशमण विभागाला माहिती दिली. परंतु, बराच वेळ होऊनही अग्रिशमणचे वाहन न आल्याने गावकऱ्यांनी आपआपल्या घरात लहान-मोठ्या भांड्यांमध्ये साचविलेले पाणी आणून आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. अन्यथा आग पसरली असता गावातील अर्ध्यापेक्षा जास्त घरे आगीच्या विळख्यात येऊन मोठया प्रमाणात वित्त व जिविताची, प्राण्याच्या जिवाची हानी झाली असती. या आगीत दत्तुजी येवलेंचे सुमारे ३० ते ४० हजाराचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान अग्निशमण दलाच्या वाहनाने घटनास्थळी येऊन आगीवर पाण्याचा मारा केला. दत्तुजी येवले यांच्या घरावरून विजेचा तार गेला असल्याने शॉक सर्कीट होऊन आगीचा गोळा किंचा चिंगारी खाली पडल्याने ही आग लागली असल्याचे समजते. याबाबत कळताच चिखलदराचे तहसिलदार जीवन मोराणकर यांनी तात्काळ संबधीत पटवारीला दत्तुजी येवले यांच्या घरी लागलेल्या आगीचा पंचनामा करण्याचे आदेशदिले. तरदुसरीकडे गावकऱ्यांनी उन्हाळा सुरू झाला असल्याने आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमणच्या वाहन चालकाचे रिक्त असलेल्या पदावर तत्काळ चालकाची नियुक्ती करण्याची मागणी नपं मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी