Jhatka Mutton : 'मल्हार सर्टीफिकेशन झटका मटण' पद्धती राज्यात अमलात येणार! मंत्री नितेश राणे यांनी केले वेबसाईटचे अनावरण

हिंदू खाटीक महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट


मटणातील भेसळ रोखण्यासाठी राज्यात हिंदूंची होणार मटण दुकाने


मुंबई : महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. 'मल्हार सर्टीफिकेशन डॉट कॉम'ने (Jhatka Mutton) ही सुरुवात केली असून 'मल्हार सर्टीफिकेशन झटका मटण' (Malhar Certification Jhatka Mutton) ही एक नवीन संकल्पना आज पासून हिंदू समाजासाठी आणली जात आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांची हिंदू खाटीक महासंघाच्या शिष्ठमंडळाने भेट घेतली. यावेळी त्यांच्या वेबसाईटचे अनावरण मंत्री नितेश राणे यांनी केले.




हिंदू खाटीक महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट.

'मल्हार सर्टीफिकेशन झटका मटण' (Malhar Certification Jhatka Mutton) या माध्यमातून आपल्याला हक्काचे मटण दुकान जिथे १०० टक्के हिंदू समाजाचे प्राबल्य असेल. कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेली नसेल. जी काही चुकीची उदाहरणं आपल्या नजरेसमोर येत आहेत ती मटणामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी मल्हार सर्टीफिकेशन झटका मटण पद्धती राज्यात अमलात आणली जाणार आहे.


हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल हिंदुत्ववादी विचाराच्या सर्व सहकाऱ्यांनी या निमित्ताने टाकलेले आहे. या 'मल्हार सर्टीफिकेशन झटका मटण'चा (Malhar Certification Jhatka Mutton) वापर आपण जास्तीत जास्त करावा किंबहुना ज्या मटनाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिकडे हिंदू समाजाने खरेदी करू नये, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.


यावेळी https://www.malharcertification.com/ या वेबसाईटचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी हिंदू खाटीक महासंघाचे सदस्य आकाश पलंगे, आदेश नकाते, प्रवीण साबळे आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म