Railway Megablock : प्रवाशांनो लक्ष द्या! उद्या मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वे प्रशासनाकडून (Railway Megablock) प्रत्येक रविवारी तांत्रिक बिघाड दुरुस्तीची किंवा इतर कामे हाती घेतली जातात. त्यामुळे रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येतो. यावेळी काही रेल्वेगाड्या रद्द केल्या जात असल्यामुळे रेल्वे प्रवाशांचा खोळंबा होत असल्याचे दिसून येते. अशातच उद्या रेल्वे प्रवास करणाऱ्यांचे हाल होणार आहेत. उद्या (दि.१६) रोजी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Railway Megablock) घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी उद्या रेल्वे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.



ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहे.



मध्य रेल्वे


स्थानक - ठाणे ते कल्याण
वेळ -
सकाळी १०.४० ते दुपारी ३.४०
मार्ग -
अप आणि डाउन जलद


परिणाम - ब्लॉक वेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. सीएसएमटी येथून ये-जा करणाऱ्या मेल-एक्स्प्रेसवर ही ब्लॉकचा परिणाम होणार आहे. यामुळे रविवारी सर्व रेल्वे फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.



हार्बर रेल्वे


स्थानक - पनवेल ते वाशी
वेळ -
सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५
मार्ग -
अप आणि डाउन


परिणाम - ब्लॉक वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल / बेलापूर तसेच पनवेल ते ठाणे दरम्यान अप आणि डाउन मार्गावरील लोकल वाहतूक बंद राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. ठाणे ते वाशी / नेरुळ आणि बेलापूर / नेरुळ ते उरणदरम्यान लोकल फेऱ्या उपलब्ध राहणार आहेत.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या