Ranbir Kapoor : आलियाचा वाढदिवस सोडून रणबीर मैत्रीला जागला

मुंबई : बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून आलिया आणि रणबीर कपूरकडे (Ranbir Kapoor) बघितलं जात. या जोडीने पुन्हा एकदा चाहत्यांसमोर आदर्श उभा केला आहे. पत्नी आलियाचा वाढदिवस असतानाही रणबीरने मैत्रीचं नातं जपण्याला प्राधान्य दिलं. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीचे वडील देब मुखर्जी यांनी वयाच्या ८३व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलिया आणि रणबीर जोडीने हजर राहिल्याचं पाहायला मिळालं.



आलियाचा आज (१५ मार्च ) वाढदिवस आहे. (Alia Birthday) मात्र आलिया आणि रणबीरने वाढदिवसाचं प्री सेलिब्रेशन १३ मार्च ला माध्यमांसोबत अलिबाग येथे केले. त्यानंतर रणबीरला अयान मुखर्जीच्या वडिलांची निधनाची बातमी समजल्यानंतर त्याने तडक मुंबई गाठली. अयान मुखर्जीच्या वडीलांचे निधन १४ मार्चला झाले. मुंबईला येताच रणबीर आणि आलिया अयान मुखर्जीच्या घरी गेले. तेव्हा अयानच्या घरी त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येणाऱ्या कलाकारांना रणबीर भेटताना दिसला. बॉलिवूडचे अनेक कलाकार अयान मुखर्जीच्या घरी आले होते. यात करण जोहर, जया बच्चन, सलीम खान अशा अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता.(Alia Birthday)


अयान सोबत रणबीरने देब मुखर्जी यांच्या पार्थिवाला खांदा दिल्याचे फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहेत. दरम्यान बायकोचा वाढदिवस असतानाही रणबीरने मैत्रीला प्राधान्य दिले. रणबीरच्या या कृतीवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने