Attack on Hindu : पश्चिम बंगालमधील माल्दामध्ये हिंदू संकटात, विरोधी पक्षनेत्याचे राज्यपालांना पत्र

माल्दा : पश्चिम बंगालमधील माल्दामध्ये हिंदू संकटात आहेत. हिंदूंच्या मालमत्तांना लक्ष्य करुन हल्ले करणे, हिंदूंना घाबरवणे असे प्रकार सुरू आहेत. प्रामुख्याने हिंदूंच्या वाहनांना आणि दुकानांना लक्ष्य केले जात आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी तातडीने माल्दामध्ये केंद्रीय सुरक्षा पथकांना बोलवावे, अशी मागणी करणारे पत्र पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांना लिहिले आहे. माल्दा जिल्ह्यातील मोथाबारीमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे मोथाबारीमध्ये तातडीने केंद्रीय सुरक्षा पथकांना नियुक्त करावे, अशीही मागणी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांच्याकडे केली आहे. राज्यपालांनी केंद्रीय सुरक्षा पथके नियुक्त करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारला आवश्यक ते निर्देश द्यावे; अशी मागणी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केली आहे.



याआधी केंद्रीय शिक्षणमंत्री आणि पश्चिम बंगाल भाजपाचे अध्यक्ष सुकांत मुजुमदार यांनी गुरुवारी संध्याकाळी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडीओ पोस्ट करुन मालदा जिल्ह्यातील मोथाबारी येथे हिंदूंवर हल्ला झाल्याचे सुकांत मुजुमदार म्हणाले. या घटनेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपालांना पत्र लिहिले. ममता बॅनर्जींचे सरकार मुसलमानांचे लांगुलचालन करण्यात मग्न आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला.



पश्चिम बंगालचे पोलीस ममता बॅनर्जी सरकारचे आदेश पाळत असल्यामुळे मुसलमानांनी काहीही केले तरी मूग गिळून गप्प बसतात. हिंदूंवर मुसलमान हल्ले करत असले तरी पोलीस हे हल्ले थोपवण्यासाठी ठोस उपाय करताना दिसत नाहीत. पश्चिम बंगाल सरकारचे वर्तन हिंदूंसाठी धोकादायक आणि राज्यातील कायदा - सुव्यवस्था बिघडवणारे असे आहे, अशी तक्रार सुवेंदू अधिकारी यांनी केली.
Comments
Add Comment

Navi Mumbai Airport आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तयार नाही? एमिरेट्सचा दावा; NMIA कडून खंडन!

मुंबई: भारतातील सर्वात मोठ्या परदेशी विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या एमिरेट्स कंपनीने, खानपान आणि मालवाहू गोदाम

Lakme Fashion Week : लडाखच्या 'पश्मिना' आणि पारंपरिक हस्तकलेचा नवी दिल्लीत डंका!

नवी दिल्ली : लडाखचे जगप्रसिद्ध 'पश्मिना' (Pashmina), सुंदर शाली आणि तिथल्या हाताच्या अप्रतिम कलाकुसरीची जादू सध्या

Bengaluru Metro : मेट्रो ठरली जीवनदायिनी! बंगळुरूमध्ये 18 मिनिटांत मानवी हृदयाची यशस्वी वाहतूक, Video Viral

बंगळूर :  बंगळूर शहरातील वाहतूक कोंडीमुळे अनेकदा रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो. मात्र, बंगळूरच्या नम्मा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष