LSG vs MI: लखनऊचा मुंबईवर १२ धावांनी विजय

लखनऊ: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या आजच्या १६व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने मुंबई इंडियन्सवर १२ धावांनी विजय मिळवला आहे. २०३ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना मुंबईच्या संघाला केवळ १९१ धावाच करता आल्या. सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी करताना संघाच्या विजयासाठी पुरेपूर प्रयत्न केले. मात्र त्याचे प्रयत्न अपुरे पडले.


या सामन्याच्या शेवटच्या षटकांत मुंबईला विजयासाठी २२ धावा हव्या होत्या.मात्र वेगवान गोलंदाज आवेश खानने मुंबईच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले. आवेशने त्या षटकांत केवळ ९ षटके दिली. मुंबई इंडियन्सला या हंगामात आतापर्यंतच्या ४ सामन्यांत केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला. तर लखनऊने चार सामन्यांपैकी २ सामने जिंकलेत.


आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरूवात चांगली राहिली नाही. त्यांनी १७ धावांवर २ गडी गमावले. दोन विकेट पडल्यानंतर नमन धीर आणि सूर्यकुमार यादव यांनी मिळून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. नमन आणि सूर्यकुमार यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी झाली. नमनने २४ बॉलमध्ये ४६ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने ४३ बॉलमध्ये ६७ धावा केल्या. यात ९ चौकारांशिवाय एका षटकाराचा समावेश आहे. सूर्या बाद झाल्यानंतर मुंबईला तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याकडून अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा फोल ठरली.


तत्पूर्वी,  लखनऊ सुपर जायंट्सची सुरूवात शानदार राहिली. मिचेल मार्श आणि एडेन मार्करम यांनी मिळून पावरप्लेमध्ये ६९ धावा केल्या. यात सर्वाधिक योगदान मिचेल मार्शचे होे. मिचेलने २७ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले. मुंबईला पहिले यश विघ्नेश पुथुरने मिळवून दिले. मार्शने ९ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३१ बॉलमध्ये ६० धावा केल्या. मार्श आणि मार्करम यांच्यात पहिल्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी झाली. त्यानंतर पांड्याने निकोलस पूरनला बाद केले. कर्णधार ऋषभ पंतची खराब कामगिरी सुरूच आहे. त्याने केवळ २ धावा केल्या.


यानंतर आयुष बदोनी आणि मार्करम यांनी चौथ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. बदोनीने चार चौकारांच्या मदतीने १९ बॉलमध्ये ३० धावा केल्या. बदोनीला अश्विनी कुमारने बाद केल्यानंतर मार्करमने आपले अर्धशतक पूर्ण केले.

Comments
Add Comment

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला