#LIVE | केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती@AmitShah @Dev_Fadnavis#Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiShivajiMaharaj https://t.co/G5OZssRut4
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 12, 2025
छत्रपती शिवाजी महाराजांसह आपल्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कायद्याने कठोर कारवाई व्हायलाच हवी, असे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासाचे महाराष्ट्र शासनाने प्रकाशन करावे अशीही मागणी केली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब मान्य केल्या.
खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने मागण्या जाहीरपणे केल्या आहेत. पण याआधीच या मागण्यांबाबत राज्य शासन आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात सविस्तर चर्चा झाली आहे. महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करणार आहे. आपल्या महापुरुषांचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून लोटून दिलं पाहिजे. पण आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. आपल्या देशात अशा गुन्हेगारांवर कायद्यानुसार कारवाई होईल. कायद्यात आणखी कठोर तरतुदी करण्याचं आम्ही ठरवलं आहे; असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास तयार करण्याचे काम लवकरच हाती घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
खासदार उदयनराजेंनी केलेल्या प्रमुख मागण्या
- छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा करा. महापुरुषांविषयी अनुद्गार काढणाऱ्यांना जामीन देऊ नये.
- राज्य सरकारने शिवरायांचा समग्र इतिहास प्रकाशित करावा. महापुरुषांविषयीच्या कलाकृती प्रसिद्ध होण्याआधी त्यांची सेन्सॉर बोर्डाकडून तपासणी करुन घेण्याचे बंधन असावे आणि त्यासाठी तसे सेन्सॉर बोर्ड करावे.
- छत्रपती शिवाजी महाराजांचे दिल्लीत स्मारक उभारावे
- शहाजीराजे भोसले यांच्या समाधीसाठी पुरेसा निधी महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारने उपलब्ध करुन द्यावा.
- राज्यपालांच्या निवासस्थानाजवळ शिवस्मारक उभारावे