Bhushan Gavai Chief Justice of India : न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे ५२ वे सरन्यायमूर्ती म्हणून घेणार शपथ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश भूषण गवई ५२ वे सरन्यायाधीश होणार आहेत.विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची पुढील सरन्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार आगामी १४ मे रोजी न्यायमूर्ती गवई हे ५२ वे सरन्यायमूर्ती म्हणून शपथ घेतील.


विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना १३ मे रोजी निवृत्त होणार आहेत.त्यानंतर न्यायमूर्ती गवई १४ मे रोजी ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील आणि पदभार सांभाळतील. न्यायमूर्ती बी. आर. गवई हे २४ मे २०१९ पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिने त्यांचा कार्यकाळ असेल. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी ते निवृत्त होतील. न्यायमूर्ती गवई हे भारताचे सरन्यायाधीश होणारे दुसरे दलित असतील. त्यांच्यापूर्वी २००७ मध्ये दलित न्यायमूर्ती के. जी. बालकृष्णन हे देशाचे सरन्यायाधीश झाले होते.



न्यायमूर्ती बी. आर. गवई मुळचे महाराष्ट्रातील आहेत. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात झाला आहे. १६ मार्च १९८५ रोजी त्यांनी वकिलीला सुरुवात केली. ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १७ जानेवारी २००० रोजी नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. १४ नोव्हेंबर २००३ रोजी उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली. १२ नोव्हेंबर २००५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी येथे त्यांनी न्यायाधीश म्हणून कार्य केले आहे.

Comments
Add Comment

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तरुणीच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना; Video Viral

देश: बऱ्याचदा रिकामा रस्ता दिसला की, आपण अनावधानाने चालतो. पण हेच अनावधानाने चालणं केव्हा आपल्या अंगाशी येईल,

Medical store CCTV : प्रत्येक मेडिकल स्टोअरवर आता ‘सीसीटीव्ही’ची नजर! सरकारचा नवा प्रस्ताव; पण औषध विक्रेत्यांचा विरोध का?

नवी दिल्ली : देशातील प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्याचा मोठा प्रस्ताव समोर

UPI transaction charges news : ₹२,००० पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर शुल्क; मुंबईतील व्यापारी चिंतेत, ग्राहकांमध्ये नाराजी

मुंबई : युपीआय (UPI) पेमेंट प्रणालीबाबत समोर आलेल्या एका नव्या प्रस्तावामुळे मुंबईतील व्यापारी आणि सर्वसामान्य

BCCI AGM : BCCIच्या वार्षिक बैठकीत IPL, बजेट अन् शताब्दी सोहळ्याबाबत मोठे निर्णय; जाणून घ्या १० महत्त्वाचे मुद्दे

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) ९५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) शुक्रवारी, १८ सप्टेंबर २०२६ रोजी

Crime News : फ्रीजमध्ये ५ वर्षांच्या लेकीचा मृतदेह, वडिलांची आत्महत्या; खोलीत फुगे, मेणबत्त्या अन् ३ सुसाइड नोट्स... नेमकं प्रकरण काय?

अमरेली : गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात कर्ज आणि आर्थिक अडचणींमुळे एका वडिलांनी आपल्या ५ वर्षीय मुलीची हत्या

Surinder koli suicide : २००६ च्या बहुचर्चित निठारी हत्याकांडातील मुख्य आरोपी सुरिंदर कोळीची आत्महत्या; हरिद्वारमधील चहाच्या टपरीवर गळफास

हरिद्वार : २००६ मधील नोएडा येथील बहुचर्चित आणि थरारक निठारी नरसंहार प्रकरणातील मुख्य आरोपी सुरिंदर कोळी याने