SSC and HSC Result : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या निकालाबाबत मोठी Update

मुंबई : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट आहे. दरवर्षी महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठ - दहा दिवसांत आणि दहावीचे निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर केले जातात. पण यंदा हे निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्र बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल १५ मे २०२५ आधी जाहीर होणार आहेत. निकाल जाहीर करण्याच्या तारखांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. ही घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.



मागच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये बारावीचा निकाल २१ मे आणि दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर झाला होता. पण यंदा म्हणजेच २०२५ मध्ये दहावी, बारावीचे निकाल १५ मे पर्यंत जाहीर होतील, असे समजते.



महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान ३५ गुण मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना गुणांसह ग्रेड देखील मिळतील. ग्रेडिंग सिस्टीमनुसार, ७५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना डिस्टिंक्शन मिळणार आहे. ६० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना प्रथम श्रेणी मिळेल. ४५ टक्के ते ५९ टक्के गुण मिळवणाऱ्यांना द्वितीय श्रेणी मिळेल. उत्तीर्ण होण्यासाठी ३५ पेक्षा जास्त गुण हवे. ज्या विद्यार्थ्यांना हे किमान गुणही मिळू शकणार नाहीत त्यांना पुन्हा पुरवणी परीक्षेला बसावे लागेल.



निकाल कुठे बघता येणार ?

  • mahahsscboard.in

  • mahresult.nic.in

  • hscresult.mkcl.org

  • msbshse.co.in

  • mh-ssc.ac.in

  • sscboardpune.in

  • sscresult.mkcl.org

  • hsc.mahresults.org.in


कसा बघावा निकाल ?

  • बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा

  • होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.

  • क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी क्रेडेंशियल भरुन ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.

  • नंतर महाराष्ट्र निकाल स्क्रीनवर दिसेल.

  • हा निकाल डाऊनलोड करता येईल.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून