Beed : बीडचा पाणी प्रश्न सोडवणार, गहिनीनाथ गडाला तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करुन पर्यटनाला चालना देण्याचे आश्वासन दिले. ते बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर नारळी सप्ताह सांगता सोहळ्यात बोलत होते. याप्रसंगी मंचावर मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस हे मंचावर उपस्थित होते.



नव्या वर्षात आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर काही आरोप केले. यानंतर नाराजी व्यक्त करत धस यांची राष्ट्रीय नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये गहिनीनाथ गडावर नारळी सप्ताह सांगता सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस हे एकाच मंचावर दिसले.



पंकजा मुंडे आणि विठ्ठल महाराज यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना गहिनीनाथ गड दत्तक घेण्याचे तसेच गडावर लोकांसाठी पुरेश्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देताना मुख्यमंत्री म्हणाले की, गड दत्तक घ्यायची माझी ऐपत नाही. पण गहिनीनाथ गडाने मला दत्तक घ्यावे. आपण सर्व मिळून गहिनीनाथ गडावर भाविकांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण करू. गडाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काम करू.



मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले. बीड जिल्ह्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ बघू देणार नाही. बीड जिल्हाला पाणीदार करणार. आष्टी तालुक्यापर्यंत पाणी आणले आहे. आता पुढे संपूर्ण बीड जिल्ह्यात पाण्याची सोय करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

बीड जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी ५३ टीएमसी पाणी गोदावरीमध्ये आणण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. कृष्णा कोयनेचे पाणी गोदावरीपर्यंत आणणार. लवकरच किमान तीस टीएमसी पाण्याचे नियोजन करणार. पाण्यासाठी दोन जिल्ह्यांमध्ये संघर्ष होऊ नये याची खबरदारी घेणार. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देणार; असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी