नवी मुंबईत बसमध्ये लैंगिक संबंध! कंडक्टरवर कारवाई, पण पोलीस अजून गप्प का?

प्रेमाच्या वेडात शहाणपण हरपलं… एनएमएमटीच्या बसमध्ये तरुण जोडप्याने काय केले वाचा...

नवी मुंबई : परदेशात नव्हे तर चक्क आपल्या नवी मुंबईत अशी घटना घडली आहे की, विचार करूनही डोळे विस्फारले जातात. प्रेम करायचं, हे कोणालाही नाकारता येणार नाही… पण जेव्हा हेच प्रेम बेशरमपणाच्या सीमारेषा ओलांडते, तेव्हा समाज काय म्हणतो? आणि प्रशासन काय करतो? असा प्रश्न या घटनेने उपस्थित झाला आहे.



नेमकी घटना काय घडली?


रविवारी सायंकाळी, नवीन मुंबई महानगरपालिकेच्या वातानुकूलित (AC) बसमध्ये एक तरुण जोडपं मागच्या बाकांवर ‘अति’ जवळीक करताना आढळलं. ती बस पनवेलहून कल्याणकडे निघाली होती. जास्त प्रवासी नव्हते. ट्रॅफिकमुळे बस थोडी मंदावली आणि बाहेरून एका दुचाकीस्वाराने त्या जोडप्याचा २२ सेकंदांचा व्हिडीओ शूट केला.


त्या व्हिडीओमध्ये दोघंही स्पष्टपणे एकमेकांमध्ये नको त्या अवस्थेत गुंतलेले दिसतात, अगदी सार्वजनिक ठिकाणी होणं अपेक्षित नसलेली कृती करताना. त्यांनी हा व्हिडीओ पुढे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला.



प्रशासन काय म्हणतं?


नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, बस कंडक्टरवर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. कंडक्टर पुरेसा सतर्क का नव्हता? त्याने तात्काळ हस्तक्षेप का केला नाही? याचे स्पष्टीकरण लेखी स्वरूपात मागवण्यात आले आहे. तर महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांचे यावर कोणतेही वक्तव्य मिळालेले नाही.



कायदा काय सांगतो?


भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६ नुसार, सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणे हा शिक्षेस पात्र गुन्हा मानला जातो. तीन महिन्यांपर्यंतची जेल किंवा १,००० रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते.


दरम्यान, आतापर्यंत महापालिकेने पोलिसांकडे तक्रार दिलीच नाही. त्यामुळे आता प्रश्न उभा राहतो की,




  • अशा घटनांना जर वेळीच आवर घातला नाही, तर त्याचं समाजावर काय परिणाम होईल?

  • कंडक्टरवर कारवाई केली जातेय, पण अश्लील वर्तन करणाऱ्या जोडप्यावर काहीच नाही?

  • कायदा सर्वांसाठी समान आहे का, की फक्त नजरेस पडलेल्यांवरच तो लागू होतो?


ही घटना केवळ एक चुकीचं वर्तन नाही. ती समाजाच्या सार्वजनिक शिस्तीवर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कंडक्टरवर कारवाई करून जबाबदारी ढकलणे सोपे आहे. पण मुख्य दोषींवरही तितकेच कठोर पाऊल उचलले जाणार का?


ही घटना केवळ नवी मुंबईची नाही, ती आपल्या सार्वजनिक वर्तनाच्या मर्यादा पुन्हा ठरवण्याची गरज अधोरेखित करते. मुंबईतही वेगवेगळ्या समुद्र किनारी आणि गार्डन परिसरात यापेक्षा वेगळे काय सुरू आहे, याचीही नीट तपासणी होणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर