Pahalgam Terror Attack : चौघांची ओळख पटली; दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देश हादरला. या भीषण घटनेत २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला असून, काहीजण गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे, या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून निवडक हत्या केल्याचे उघड झाल्याने संतापाचा अजूनच उद्रेक झाला आहे.


या हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत चार दहशतवाद्यांची ओळख पटली असून, त्यापैकी दोन पाकिस्तानी आणि दोन स्थानिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्लेखोरांचा एक फोटो देखील समोर आला आहे. बैसरन परिसरात हा हल्ला करण्यात आला होता. विशेष म्हणजे, चार जणांनी थेट हल्ला केला, तर आणखी तीन जण दूरवरून कारवाईवर लक्ष ठेवून होते, अशी माहितीही समोर आली आहे.



हल्लेखोरांनी पश्तून भाषेत संवाद साधत, जवळपास १५ ते २० मिनिटे एके-४७ रायफलमधून गोळीबार केला. त्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत ठरवून ठार मारल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले आहे.


स्थानिक दहशतवाद्यांपैकी आदिल गुरी आणि आसिफ शेख यांची नावे निष्पन्न झाली आहेत. तर उर्वरित दोन दहशतवादी पाकिस्तानातून आलेले असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या अमानवी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित 'द रेसिस्टन्स फ्रंट' या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.



देशभरातून या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त होत असून, संबंधित दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत.

Comments
Add Comment

चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला, 20 ची कचोरी पडली 20 लाखांना; कसं काय CCTV व्हिडिओमधून प्रकार उघड

जयपूर : अवघ्या 20 रुपयांची कचोरी खाण्यासाठी थांबलेल्या एका कलेक्शन एजंटला तब्बल 20 लाख रुपयांचा फटका बसल्याची

सुप्रीम कोर्टात नोकरी मिळवण्याची संधी! पात्रता, पगार आणि अर्जाची संपूर्ण माहिती

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (Supreme Court of India) मध्ये 'कोर्ट मास्टर (शॉर्टहँड)' या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, सरकारी

नोएल टाटा १२ नोव्हेंबरला सहा कंपन्यांच्या मंडळातून पायउतार होणार , टाटा सन्सवर कायम

टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा १२ नोव्हेंबर २०२६ रोजी टाटा समूहाच्या सहा कंपन्यांच्या संचालक मंडळातून

Andhra Odisha Cyclone : 'अर्णब' चक्रीवादळाचा आंध्र-ओडिशात प्रचंड हाहाकार; विशाखापट्टणममध्ये १८ तासांत ढगफुटीसदृश पाऊस, ३ जणांचा मृत्यू तर ८७ हजार नागरिकांचे स्थलांतर

विशाखापट्टणम : बंगालच्या उपसागरात आकारास आलेल्या 'अर्णब' या अतितीव्र चक्रीवादळाने मंगळवारी आंध्र प्रदेशच्या

Cyclone Arnab : अर्नब चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले, कमकुवत होण्यास सुरुवात

Cyclone Arnab : अत्यंत तीव्र चक्रीवादळ अर्नबने बुधवारी पहाटे आंध्र प्रदेश आणि यानम किनारपट्टीवर धडक दिली. पहाटे दोन ते

Central Government Employes: केंद्रीय सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, महागाई भत्त्यामध्ये 3 % ने वाढ

नवी दिल्ली: केंद्र सरकारने लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक मोठी भेट दिली आहे. केंद्रीय