Ladki Bahin Yojana : तारीख ठरली! लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये

मुंबई : महायुती सरकारने (Mahayuti) महिलांच्या आर्थिक दृष्टया सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न २.५० लाखांहून कमी असणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. आतापर्यंत महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांना (Maharashtra Women) ९ हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर आता एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना महत्त्वाची बातमी समोर आली आहे.



मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana April Installment) पुढील हप्ता ३० एप्रिल २०२५ पर्यंत दिला जाणार असल्याची घोषणा केली आहे. ३० एप्रिल रोजी अक्षय तृतीया असून त्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. सध्या लाडक्या बहिणीच्या अर्जांची तपासणी सुरु असून, योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.  योजनेच्या निकषांनुसार ज्या महिलांचं उत्पन्न हे २.५० लाखांपेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेतून ९ लाख अपात्र महिलांची नावे वगळण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.



८ लाख लाडक्या बहिणींचा हप्ता कपात


सरकारच्या नियमानुसार, एकाच व्यक्तीला वैयक्तिक लाभाच्या केवळ एका योजनेचा फायदा घेता येतो. पण मागील काही काळात अनेक महिला एकाचवेळी शेतकरी सन्मान निधी आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले. या प्रकाराची सरकारने छाननी केली असून, ज्या महिला दोन्ही योजना घेतात त्यांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून केवळ ५०० रुपयेच मिळतील, असा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयामुळे सुमारे ८ लाख लाभार्थी महिलांवर परिणाम होणार आहे.


‘आर्थिक लाभाचा दुहेरी फायदा मिळू नये, यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे यापुढे संबंधित महिलांना केवळ एकाच योजनेचा मुख्य लाभ घेता येणार असून, दुसऱ्या योजनेतील सहाय्य मर्यादित स्वरूपात मिळेल’ असे सरकारने स्पष्ट केले आहे.



लाडक्या बहि‍णींना २१०० कधी मिळणार?


महायुती सरकारने लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना २१०० देऊ, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहिरनामा हा ५ वर्षांसाठी असतो. या काळात आम्ही लाडक्या बहि‍णींना कधीही २१०० रुपये देऊ, असे म्हटले होते. त्यामुळे २१०० रुपये कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ladki Bahin Yojana)

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा