Ladki Bahin Yojana : आता १५०० नाही ३००० येणार! एप्रिल-मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर म्हणजेच ३० एप्रिल २०२५ पर्यंत मिळणार अशा चर्चा सुरु होत्या. मात्र एप्रिल महिना उलटून २ दिवस झाले असले तरी अद्यापही महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता आला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.



मागील महिन्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाचवेळी देण्यात आला होता. त्याचप्रमाणे यावेळीही एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकाचवेळी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला देणार याबाबत आदिती तटकरे () लवकरच घोषणा करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींचे (Ladki Bahin Yojana)  मे महिन्याकडे लक्ष लागले आहे.


दरम्यान, महायुती सरकारने (Mahayuti) महिलांच्या आर्थिक दृष्टया सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न २.५० लाखांहून कमी असणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. आतापर्यंत महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांना (Maharashtra Women) ९ हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर आता लाडक्या बहिणींना एप्रिल आणि  मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का आणि कधी मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.



लाडक्या बहि‍णींना २१०० कधी मिळणार?


महायुती सरकारने लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना २१०० देऊ, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहिरनामा हा ५ वर्षांसाठी असतो. या काळात आम्ही लाडक्या बहि‍णींना कधीही २१०० रुपये देऊ, असे म्हटले होते. त्यामुळे २१०० रुपये कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ladki Bahin Yojana)



८ लाख लाडक्या बहिणींचा हप्ता कपात


सरकारच्या नियमानुसार, एकाच व्यक्तीला वैयक्तिक लाभाच्या केवळ एका योजनेचा फायदा घेता येतो. पण मागील काही काळात अनेक महिला एकाचवेळी शेतकरी सन्मान निधी आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले. या प्रकाराची सरकारने छाननी केली असून, ज्या महिला दोन्ही योजना घेतात त्यांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून केवळ ५०० रुपयेच मिळतील, असा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयामुळे सुमारे ८ लाख लाभार्थी महिलांवर परिणाम होणार आहे. (Ladki Bahin Yojana)

Comments
Add Comment

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा