बुटाच्या लेसने घेतला मॉडेलचा जीव, मृतदेह टॅक्सीत घेऊन फिरला खुनी; हत्येची थरारक कहाणी

मुंबई : वेळ दुपारची. तारीख १५ ऑक्टोबर २०१८. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाचा फोन खणाणला. नियंत्रण कक्षातील एका अधिकाऱ्याने फोन घेतला. फोन करणाऱ्याने टॅक्सीचालक असल्याचे सांगत माहिती देण्यास सुरुवात केली. माझ्या टॅक्सीतून आलेल्या व्यक्तीने एका झाडाजवळ जड सुटकेस फेकून दिली. नंतर रिक्षा करुन कुठेतरी झपाट्याने निघून गेला. ही माहिती फोन करणाऱ्याने दिली. पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीने सुटकेस कुठे फेकण्यात आली, त्या जागेचा पत्ता सांगितला. माहिती मिळताच पोलिसांचा नियंत्रण कक्ष सक्रीय झाला. ज्या ठिकाणी सुटकेस फेकण्यात आल्याचे सांगण्यात आले होते तिथे जवळच असलेल्या पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. झाडाजवळ फेकण्यात आलेली सुटकेस पोलिसांनी ताब्यात घेतली.

सुटकेसमध्ये काय आहे हे बघण्यासाठी ती उघडण्यात आली तेव्हा उपस्थित असलेल्या सगळ्यांचे डोळे विस्फारले. सुटकेसमध्ये होता एका २० - २२ वर्षांच्या तरुणीचा मृतदेह... ही धक्कादायक घडली ती मुंबईतील मालाडमध्ये. पोलिसांनी मृतदेह बघताच तातडीने परिसरातले सगळे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले आणि तपासले. फोन करुन पोलिसांना माहिती देणाऱ्या व्यक्तीला शोधून त्याचीही चौकशी करण्यात आली. या चौकशीअंती सुटकेस फेकून पळालेल्या व्यक्तीला शोधून अटक करण्यात आली. अवघ्या काही तासांत कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी सुटकेस फेकणाऱ्याला अटक केली. या अटकेतील व्यक्तीचे नाव होते मुझम्मिल सईद. सईदने ज्या तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन फेकला होता ती होती राजस्थानच्या कोटा शहरातील एक उदयोन्मुख मॉडेल. मॉडेलचे नाव होते मानसी दीक्षित. मानसीची हत्या का करण्यात आली, ही हत्या कोणी आणि कशा प्रकारे केली अशा सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांना शोधायची होती. ही उत्तरं शोधण्यासाठी सुटकेस फेकणाऱ्याची कसून चौकशी करण्यात आली.

मिस कोटा ब्युटी कॉन्टेस्ट २०१४ मध्ये मानसी दीक्षित ही पहिली रनर अप झाली होती. काही वर्षांनी ती मुंबईत आली आणि तिला मालिकांमध्ये काम मिळू लागले. इथेच सोशल मीडियाद्वारे मानसीची मुझम्मिल सईदशी ओळख झाली. मुझम्मिल सईदने फेसबुकवरुन मानसीला स्वतःची ओळख एक अभिनेता म्हणून करुन दिली होती. मानसी आणि मुझम्मिल सईद यांच्यात ऑनलाईन गप्पा वाढू लागल्या.

मूळच्या हैदराबादच्या अलेल्या मुझम्मिल सईदचे मुंबईत जोगेश्वरी येथे घर होते. एकेदिवशी संधी साधून मुझम्मिल सईदने मानसीला स्वतःच्या जोगेश्वरीच्या फोटोशूटसाठी बोलावले. निर्माता - दिग्दर्शक यांना दाखवण्यासाठी फोटोशूट करतो असे सांगून मुझम्मिल सईदने मानसीला घरी बोलावले. फोटोशूटच्या निमित्ताने मुझम्मिल सईदने मानसीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मानसीने विरोध केला त्यावेळी चिडलेल्या मुझम्मिल सईदने जवळच असलेले स्टूल मानसीच्या डोक्यावर मारले. या आघातामुळे मानसी बेसुद्ध झाली. ती बेशुद्ध असताना मुझम्मिल सईदने तिच्याशी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात मानसीला शुद्ध आली. आता बिंग फुटेल या भीतीने मुझम्मिल सईदने पटकन स्वतःच्या बुटाच्या लेस (बुटाच्या नाड्या) काढल्या आणि त्यांच्या मदतीने गळा आवळून मानसीची हत्या केली. यानंतर मुझम्मिल सईदने मानसीचा मृतदेह एका सुटेकसमध्ये भरला.

सुटेकस घेऊन मुझम्मिल सईद घरातून बाहेर पडला. एका टॅक्सीत बसायचे ती एखाद्या ठिकाणी दुसरी टॅक्सी पकडायची. चालकाशी जास्त बोलणे टाळायचे. एखाद्या चालकाने सुटकेस बाबत चौकशी सुरू केली की लगेच टॅक्सी सोडायची आणि दुसरी टॅक्सी पकडायची. असे करत फिरत फिरत अखेर मुझम्मिल सईद मालाडमध्ये एका निर्जन ठिकाणी पोहोचला. याच ठिकाणी एका झाडाजवळ सुटकेस टाकून मुझम्मिल सईद नंतर एका ऑटो रिक्षात बसून निघून गेला. पण जागरुक असलेल्या शेवटच्या टॅक्सी चालकाने पोलिसांना माहिती दिली. यामुळे तपास पथक अखेर मुझम्मिल सईद पर्यंत पोहोचले.

पोलीस जेव्हा जोगेश्वरीत मुझम्मिल सईदच्या घरी पोहोचले त्यावेळी तो घरातले रक्ताचे डाग पुसत बसला होता. हे बघून पोलिसांनी मुझम्मिल सईदला लगेच अटक केली आणि त्याची चौकशी सुरू केली. अखेर मुझम्मिल सईदने गुन्ह्याची कबुली दिली.
Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन