IPL 2025 : मुख्य टप्पा सुरू, क्वालिफायर १ मध्ये पंजाब - बंगळुरू तर एलिमिनेटरमध्ये गुजरात - मुंबई आमनेसामने

चंदिगड : आयपीएल २०२५ चे सर्व साखळी सामने संपले आहेत. आता मुख्य टप्पा सुरू झाला आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता चंदिगडमध्ये क्वालिफायर १ होणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने असतील. या सामन्यातील विजेता थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. तर पराभूत संघाला एलिमिनेटरच्या विजेत्यासोबत क्वालिफायर २ मध्ये खेळावे लागेल. क्वालिफायर २ चा विजेता फायनलमध्ये क्वालिफायर १ च्या विजेत्या विरुद्ध मैदानात उतरेल. फायनल जिंकणारा संघ आयपीएल २०२५ चा विजेता होईल.

भारतीय वेळेनुसार आज म्हणजेच गुरुवार २९ मे रोजी क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने असतील. उद्या म्हणजेच शुक्रवार ३० मे रोजी एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने असतील. दोन्ही सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होतील. हे दोन्ही सामने चंदिगडच्या न्यू पीसीए स्टेडियममध्ये होणार आहेत.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर २ आणि फायनल होणार आहे. भारतीय वेळेनुसार रविवार १ जून रोजी क्वालिफायर २ आणि मंगळवार ३ जून रोजी फायनल होणार आहे. दोन्ही सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होतील. या दोन्ही मॅचचे प्रतिस्पर्धी अद्याप ठरलेले नाहीत.

Comments
Add Comment

Dakar Youth olympics 2026 : भारताचा ऐतिहासिक सुवर्णप्रवास; 9 पदकांसह पदकतालिकेत दिमाखदार कामगिरी

डकार (सेनेगल) : डकार येथे सुरू असलेल्या चौथ्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय युवा खेळाडूंनी दमदार

आयपीएल 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत अक्षर पटेल; फ्रँचायझीमध्ये खळबळ!

नवी दिल्ली : आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2027 च्या लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या गोटातून मोठी बातमी समोर येत

IND Vs NZ 4th ODI Live Streaming: चौथा वनडे सामना कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या खेळपट्टीसह सर्व बाबी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील तीन सामन्यानंतर 2-0 अशी स्थिती आहे.

IND vs NZ: रोहित शर्मासोबत ओपनिंग कोण करणार? इशान किशन नाही तर या खेळाडूचं नाव चर्चेत

[caption id="attachment_1074512" align="aligncenter" width="800"] भारत न्यूझीलंड यांच्यातील चौथा वनडे सामना ओव्हल मैदानात शुक्रवारी खेळला जाणार आहे. या

U19 Asia Cup 2026 अंतिम फेरीत भारत पाकिस्तान सामना, सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानला नमवलं

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या जेतेपदाच्या लढतीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. उपांत्य फेरीच्या

U19 Asia Cup 2026: बांगलादेशला नमवून पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत, भारताशी सामना होणार!

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लढत झाली. या लढतीत पाकिस्तानने बाजी