Pakistani Spy Arrested : हनी ट्रॅप मध्ये अडकला नेव्हल डॉकचा फिटर, बनला पाकिस्तानी गुप्तहेर

ठाणे: नेव्हल डॉकमध्ये फिटर म्हणून कामाला असलेला कर्मचारी रवी वर्माला पाकिस्तासाठी हेरगिरी (Pakistani Spy in thane) करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रवी वर्मा हा ठाण्यातील कळवा येथे राहणारा असून, हनी ट्रॅप प्रकरणद्वारे त्याने अनेक गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचा संशय आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या गद्दारांच्या शोध कारवाईला युध्दपातळीवर सुरुवात झाली आहे.  या कारवाईत आत्तापर्यंत वेगवेगळ्या राज्यातील हेर ताब्यात घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रात देखील यासंदर्भात कारवाई करण्यात आली असून, ठाणे जिल्ह्यातील कळवा येथून रवी कुमार वर्मा या हेराला अटक करण्यात आलं आहे. रवी हा नेव्हल डॉकमध्ये फिटर म्हणून कामाला होता. तो वर्षभरापासून फेसबुकच्या माध्यमातून एका महिलेच्या संपर्कात होता. ती मुलगी व्हिडिओच्या माध्यमातून त्याला तिचे अश्लील व्हिडिओ पाठवत असत. ज्यामुळे त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवत, त्याच्याकडून अनेक गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचर संघटनेने मिळवली असण्याची शक्यता आहे.

रवी नेवल डॉकमध्ये फिटर म्हणून कामाला असल्याने त्याला संपूर्ण परिसराची माहिती होती. या व्यतिरिक्त तो केरळ, कोची आणि अलिबाग येथे देखील कामानिमित होता. त्यानं या भागातील काही गोपनीय माहिती पाकिस्तानी मुलीला दिली होती.

तपासात काय आढळले?


रवी वर्माची आज (३० मे) पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली. आत्तापर्यंतच्या तपासात असे आढळून आले की आरोपीने नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत एका मोठ्या संघटनेची संवेदनशील माहिती शेअर केली होती. रवी पाकिस्तानमधील दोन फेसबुक अकाऊंटच्या संपर्कात होता. पायल शर्मा आणि इस्प्रीत या नावांची ही पाकिस्तानी खाती आहेत. रवीनं तब्बल १४ पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती या फेसबुक खात्यांना पाठवली होती. युद्धनौका तसेच इतर जहाजाची माहिती आणि चित्रही बनवून पाकिस्तानला पाठवली. तो नोव्हेंबर २०२४ पासून त्यांच्या संपर्कात होता. नेव्हल डॉकमधल्या परिसरात मोबाईल नेण्यास बंदी असल्याने आरोपी रवी युद्धनौकांचे स्ट्रक्चर आणि इतर माहिती लक्षात ठेवत असे. त्यानंतर तो पायल शर्मा आणि इस्प्रीत या अकाउंटला पाठवत असे. रवी ही सर्व माहिती ऑडियो आणि टेक्स्ट स्वरूपात तसेच चित्र काढून पाठवायचा असेही तपासात आढळले आहे. पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हची फेसबुक अकाऊंट असलेल्या पायल शर्मा आणि इस्प्रित या खात्यावरून एका प्रोजेक्टसाठी युद्धनौकांची माहिती हवी आहे, अशी मागणी रवी वर्माकडे होत होती. हनी ट्रॅपमध्ये अडकलेला रवी वर्मा ही माहिती पायल शर्मा आणि इस्प्रितला वारंवार पाठवत होता, असे तपासात आढलले आहे.
Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा