रिक्त राहिलेल्या २२ जिल्हाध्यक्षांची भाजपाकडून निवड

अहिल्यानगर, नाशिक, पालघर, वसई-विरारसह मुंबईतील तीन जणांचा समावेश


मुंबई : राज्यातील रिक्त राहिलेल्या जिल्हाध्यक्षपदांसाठीची निवड भाजपाकडून जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून एकूण २२ नेत्यांकडे जिल्हास्तरावरील महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाकडून राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील अध्यक्षांची निवड करण्यात आली होती.


राज्यातील रिक्त राहिलेल्या जिल्हाध्यक्षपदांसाठीची निवड भाजपाकडून जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून एकूण २२ नेत्यांकडे जिल्हास्तरावरील महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपाकडून राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील अध्यक्षांची निवड करण्यात आली होती. मात्र काही जिल्ह्यातील नावांची घोषणा करण्यात आली नव्हती, अखेर शनिवारी त्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील मिळून एकूण २२ नेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.


भाजपाकडून शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या जिल्हाध्यक्षांच्या यादीमध्ये पालघरच्या जिल्हाध्यक्षपदी भरत राजपूत, वसई-विरारच्या जिल्हाध्यक्षपदी प्रज्ञा पाटील, अहिल्यानगर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते, नाशिक शहरच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील केदार, नाशिक दक्षिणच्या अध्यक्षपदी सुनील बच्छाव, नाशिक उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी यतीन कदम, पुणे दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी शेखर वडणे, कोल्हापूर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे.




बीडची शंकर देशमुखांकडे धुरा


गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश बारसागडे, चंद्रपूर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी सुभाष कासमगुट्टवार, चंद्रपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी हरिश शर्मा, वर्ध्याच्या जिल्हाध्यक्षपदी संजय गाते, परभणी ग्रामीणच्या शहराध्यक्षपदी सुरेश भुबंरे, छत्रपती संभाजीनगर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर शितोळे, लातुर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी अजित पाटील कव्हेकर, लातुर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी बसवराज पाटील, नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर देशमुख, नांदेड दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी संतुकराव हंबर्डे, बीडच्या जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख यांची निवड करण्यात
आली आहे.



मुंबईतील उत्तर पश्चिम, दक्षिण मध्य, दक्षिण मुंबईचेही जिल्हाध्यक्ष ठरले


मुंबईमधील तीन जिल्हाध्यक्षांची निवडही करण्यात आली असून, मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानमूर्ती शर्मा, दक्षिण मध्य मुंबईच्या अध्यक्षपदी निरंजन उभारे आणि दक्षिण मुंबईच्या अध्यक्षपदी शलाका साळवी यांची निवड करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर