पोलिसांची धडक कारवाई, कोट्यवधी रुपयांची बनावट कृषी रसायने जप्त

चित्तोडगड : तेलंगणा पोलिसांनी राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यातील बस्सी गावातील एका फार्म हाऊसवर धाड टाकली. धाड टाकून पोलिसांनी राजू चेचानी याला अटक केली. याआधी पोलिसांनी हैदराबादमधील ई राजेशच्या गोदामावर धाड टाकून कोट्यवधी रुपयांची बनावट कृषी रसायने जप्त केली होती. याच प्रकरणात पोलिसांनी राजू चेचानी याला अटक केली. या कारवाईमुळे भारतातील कृषी क्षेत्राला असलेला बनावट कीटकनाशकांचा वाढता धोका उघडकीस आला आहे.

बनावट कीटकनाशके वाजवी दरात विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. एकदम खऱ्या ब्रँडसारखी पॅक केलेली ही बनावट रसायने शेतीसाठी अत्यंत हानिकारक असतात. त्यांच्या वापरामुळे तसेच त्यातील घातक घटकांमुळे अनेकदा पिकांचे नुकसान होते आणि उत्पादनात घट होते. नुकत्याच झालेल्या अटकेमुळे अशा प्रकाराला आळा बसेल अशी आशा व्यक्त होते आहे. अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या बनावट कृषी रसायनांची पुरवठा साखळी तोडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चेचानी मागील सात वर्षांपासून अकरा पेक्षा जास्त राज्यांमध्ये त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बनावट कृषी रसायनांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत होता, असा आरोप पोलिसांनी त्याच्यावर केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार चेचानी दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथे कार्यरत असलेल्या सहकाऱ्यांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे प्रतिष्ठित कृषी रसायन कंपन्यांचे लेबल लावलेली बनावट उत्पादने शेतकऱ्यांना वाजवी दरात विकत होता. या प्रकरणात पुढील पोलीस कारवाई आणि तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

कांदिवली रेल्वे स्थानकात हायव्होल्टेज ड्रामा! हुज्जत घालताना महिला टीसीचे कपडे फाटले; GRP, RPF पोलिसांचा हस्तक्षेप

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर महिला टीसीची आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या महिलेमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना

FDA Raids: रिलायन्स, ब्लिंकिट आणि झोमॅटोला FDA चा दणका, संचालकांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने मुदत संपलेले, खराब झालेले आणि विक्रीसाठी नाकारलेले खाद्यपदार्थांची अफरातफर करून

Thane News: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, गरबा आणि रास दांडिया खेळण्यासाठी वेळेमध्ये केली वाढ; जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

ठाणे: गरबा आणि रास दांडियाप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवरात्रीचे सध्या शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले

Madhuri Dixit: 'धक धक गर्ल'चा गुलाबी साडीत घायाळ करणारा लूक, पाहा Photos

[caption id="attachment_1067345" align="aligncenter" width="800"] अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीवर अधिराज्य

विजयादशमी 2026: जाणून घ्या रावण दहनाचा शुभ मुहूर्त, पूजा आणि या सणाशी संबंधित ५ महत्त्वाच्या गोष्टी

सनातन धर्मात असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणून विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा पवित्र सण अत्यंत

एक स्त्री कशी असते हे समजलं... 'रणबाली' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर रश्मिकाने शेअर केली खास पोस्ट

टॉलिवूडची लोकप्रिय जोडी विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचा बहुचर्चित पीरियड ॲक्शनपट