फिल्ममेकर मनिष गुप्ताने स्वतःच्याच ड्रायव्हरवर केला चाकू हल्ला

मुंबई : अभिनेत्री रविना टंडन, मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण यांच्यासह अनेक कलाकारांना घेऊन फिल्ममेकिंग करणाऱ्या फिल्ममेकर मनिष गुप्ताने स्वतःच्याच ड्रायव्हरवर चाकू हल्ला केला. ही धक्कादायक घटना वर्सोवा येथे सागर संजोग इमारतीत मनिष गुप्ताच्या घरात घडली. रजिबुल इस्लाम लष्कर नावाचा वाहन चालक तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून फिल्ममेकर मनिष गुप्ताकडे काम करत होता. मनिष गुप्ता आणि रजिबुल इस्लाम लष्कर या दोघांच्यात पगाराच्या मुद्यावरुन मतभेद झाल्याचे वृत्त आहे. वाद वाढला आणि मनिष गुप्ताने रजिबुल इस्लाम लष्करवर चाकू हल्ला केला. या प्रकरणात वर्सोवा पोलिसांनी मनिष विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

रजिबुल इस्लाम लष्करने दिलेल्या माहितीनुसार तो मनिष गुप्ताकडे दरमहा २३ हजार रुपये पगारावर काम करत होता. हा पगार वेळेत मिळत नव्हता. मनिष गुप्ताने रजिबुल इस्लाम लष्करला थकीत पगार न देताच नोकरीवरुन काढून टाकल्याचे सांगितले. याच मुद्यावरुन दोघांच्यात वाद झाला. वाद वाढला आणि मनिष गुप्ताने चाकू हल्ला केला, असे रजिबुल इस्लाम लष्करने सांगितले.

पोलिसांनी गुन्हा नोंदवला असला तरी अद्याप मनिष गुप्ताला अटक केलेली नाही, असे रजिबुल इस्लाम लष्करचे म्हणणे आहे. त्याने मनिषच्या अटकेची मागणी केली आहे.

मनिष गुप्ता लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याने द स्टोनमॅन मर्डर्स, 420 IPC या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्याने अभिनेत्री रविना टंडन, मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण यांना घेऊन वन फ्रायडे नाईट हा चित्रपट केला होता. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या व्यतिरिक्त मनिष गुप्ता हा रामगोपाल वर्माच्या चित्रपटांसाठी स्क्रीनप्ले रायटिंग करत होता. डी आणि सरकार या दोन्ही चित्रपटांची कथा त्यानेच लिहिली होती.
Comments
Add Comment

अजय देवगणमुळेच चित्रपट मिळतात ? इशिता दत्ताने अखेर मौन सोडलं; म्हणाली, मी…

मुंबई : बॉलिवूडमध्ये कलाकारांना मिळणाऱ्या चित्रपटांच्या संधी आणि त्यामागील ओळखी यावर नेहमीच चर्चा होत असते.

Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी वेगात; रामकुंड येथे 51 आणि 31 फुटांचे धर्मध्वज उभारले

Nashik News: नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असून, 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या

मुंबईत मंत्रालयाजवळ बेस्ट बस आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

मुंबईतून एक मोठी आणि खळबळजनक अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मंत्रालयाजवळ वाय.

Yavatmal : यवतमाळमध्ये भरधाव कारचा थरार ! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद

यवतमाळ : यवतमाळ शहरातील पिंपळगाव बायपासवर भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात

Dussehra 2026 : दसऱ्याला शस्त्रपूजा का केली जाते? जाणून घ्या विजयादशमीचे महत्त्व, तारीख आणि रावण दहनाचा शुभ मुहूर्त

Dussehra 2026 : हिंदू धर्मात विजयादशमी अर्थात दसरा हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर

Breaking : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; कोटा येथून तिन्ही संशयित ताब्यात

Mumbai Crime News: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर मुंबईत झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या