गुरुजी आमचे रोजच फळ्यावर लिहायचे सुविचार म्हणायचे सुविचारासारखा मुलांनो हवा आचारआधी करावे, मग सांगावे असेच वागत जावे नशिबापेक्षा मेहनतीलाच अधिक आपले मानावेअहंकाराचा कधीही वारा लागू न द्यावा कर्मावरच पुरता आपला विश्वास ठेवावासमस्या म्हणजे संधींचे असते नवे रूप स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी खूपअडचणींचा सामना करणे हे यशाचे प्रवेशद्वार स्वतःवर विश्वास ठेवा स्वप्नं तुमची होतील साकाररोजच नवा दिवस रोजच नवा सुविचार सुविचारांमधील अर्थाचे समजून घ्यावे सारगुरुजी म्हणती सुविचारांना द्यावी कृतीची जोड कर्तव्याची फळे नेहमीच लागत असतात गोड
काव्यकोडी
१) कुत्र्यासारखे तोंड शेपूट झुपकेदार शिकारीच्या शोधात रात्री फिरतो फारसंस्कृतमध्ये याला ‘जंबूक’ सारे म्हणतात ‘कुँई कुँई’ आवाजात कोण ओरडतात?२) मागचे पाय कमकुवत नसतो त्यात दम जबडा मात्र या प्राण्याचा असतो खूप भक्कमदुसऱ्यांच्या शिकारीवर जगणारा हा प्राणी या प्राण्याचे नाव लवकर सांगा कोणी?३) घराची करतो राखण गुन्ह्याचा लावतो तपास अनेकांच्या सोबतीला असतो बरं हमखासरंग, रूप, आकार याचा वेगवेगळा असतोइमानदार प्राणी म्हणतात कोण बरं दिसतो?उत्तर - १) कोल्हा २) तरस३) कुत्रा eknathavhad23 @gmail.com