वन्यप्राण्यांना दत्तक घेण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची योजना

मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांचे पालकत्व घेता येणार असून त्याबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने घोषणा केली आहे. वर्षभर वाघ, सिंहाचे पालकत्व घेण्यासाठी प्रत्येकी साधारण तीन लाख रुपये, तर बिबट्यासाठी दीड लाख रुपये मोजावे लागणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे वन्यप्राणी दत्तक योजना राबविण्यात येते. या योजनेनुसार वाघ ३ लाख १० हजार रुपये, सिंह ३ लाख रुपये, बिबट्या १ लाख २० हजार रुपये, वाघाटी ५० हजार रुपये, नीलगाय ३० हजार रुपये आणि हरिण २० हजार रुपये भरून वर्षभरासाठी दत्तक घेता येणार आहे.


यापूर्वी मंत्री रामदास आठवले यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या दत्तक घेतला होता. तसेच सामाजिक कार्यकर्त्या साधना वझे या अनेक वर्षे बिबट्याला दत्तक घेत आहेत. याचबोरबर प्रताप सरनाईक, अभिनेता समुमित राघवन यांनीही प्राणी दत्तक घेतले आहेत. तसेच दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनीही २०२१ पासून विविध वन्य प्राणी दत्तक घेतले होते.


वन्य प्राण्यांचा आहार, उपचारांवरील खर्च, तसेच मानवी साखळीत महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या वन्य प्राण्याविषयी शहरवासीयांची जवळीक वाढावी या उद्देशाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्यप्राणी दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे. वन्यप्राणी दत्तक योजनेअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यप्राण्यांच्या प्रजाती एक वर्षांच्या करारावर दत्तक घेता येतात. वर्षभर प्राण्यांचा आहार व उपचाराचा खर्च संबंधिताला दत्तक घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो.


केवळ आर्थिक मदतीपुरती ही योजना मर्यादित नाही. यामुळे वन्यजीवांविषयी सामान्य नागरिकांना प्रेम, आपुलकी वाटावी हा या योजनेमागे उद्देश आहे. तसेच एखादा वन्यप्राणी दत्तक घेतल्यास त्या व्यक्तीला त्याचे पालकत्व स्वीकारल्याचे प्रमाणपत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून देण्यात येते. दत्तक घेणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा फलक त्या प्राण्याच्या पिंजऱ्यजवळा लावण्यात येतो. तसेच आठवड्यातून एकदा कुटुंबासह त्या प्राण्याची नि:शुल्क पाहणी करता येते. या योजनेअंतर्गत सिंह, वाघ, वाघाटी, बिबट्या, नीलगाय आणि हरिण या वन्यजीवांना दत्तक घेता येते.

Comments
Add Comment

मुंबईतील कुकची महिना 1.05 लाख कमाई, एमबीएवाल्यांनाही मागे टाकले

मुंबईत एका घरात स्वयंपाकाचे काम करणाऱ्या कुकची कहाणी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या कुकची

Mumbai Diwali fire: मुंबईत पाच दिवसांमध्ये एकूण 499 आगीच्या दुर्घटना; फटाक्यांमुळेच लागल्या तब्बल 333 आगी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईत दीपावलीच्या उत्सवामध्ये मोठयाप्रमाणात आगी लागण्याच्या दुर्घटना घडल्या असून

Water Wastage : पाण्याचा अपव्यय: आयुक्तांचे आदेश धाब्यावर, रस्त्यांवर मोटरद्वारे पाण्याचा वापर करून धुतली जातात वाहने

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पाणी समस्येच्या पार्श्वभूमीवर पिण्याचा पाण्याचा अपव्यय होवून तसेच पिण्या

KEM Hospital Lift News : केईएम रुग्णालयातील लिफ्ट बंद..., प्लास्टर घातलेल्या रूग्णांना घसरत उतरावे लागतात जिने

मुंबई (विशेष प्रतिनिधी) केईएम रुग्णालयात आधीच येथील ओपीडी मध्ये रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णांना उपचार

एका सदस्याच्या अपात्रतेमुळे संपूर्ण कुटुंबाचा रेशनचा लाभ बंद करू नका; राज्य अन्न आयोगाची सरकारला सूचना

मुंबई : एकाच शिधापत्रिकेवर समाविष्ट असलेल्या कुटुंबातील एखादा सदस्य अपात्र ठरल्यास संपूर्ण कुटुंबाचा

Kurla Crime: कुर्ल्यात दिवसाढवळ्या गोळीबाराचा थरार! तीन गोळ्या झाडून 40 वर्षीय व्यक्तीची हत्या

मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात बुधवारी दुपारी दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारात विनोद मल्लाप्पा पवार (वय 40) यांचा