Sassoon Hospital : पुण्यातील ससून रूग्णालयातील डॉक्टरचा मृत्यू

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातील मनोविकारतज्ञ आणि विभागप्रमुख डॉ. नितीन अभिवंत यांचे हिमालयातील ट्रेकदरम्यान दुर्दैवी निधन झाले आहे. बुरान व्हॅली (हिमाचल प्रदेश) येथे ट्रेकिंग करताना श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.


डॉ. अभिवंत हे केवळ ४२ वर्षांचे होते आणि त्यांना ट्रेकिंगची विशेष आवड होती. शनिवारी ते काही डॉक्टर मित्रांसह मुंबईहून बुरान व्हॅली ट्रेकसाठी रवाना झाले. सोमवारी सकाळी गिर्यारोहणास सुरुवात केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात त्यांना धाप लागली, घाम फुटला आणि श्वासोच्छवासात अडथळा जाणवू लागला.



त्याच वेळी उपस्थित असलेल्या दोन डॉक्टर मित्रांनी तातडीने प्रथमोपचार केले आणि जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह मित्र, सहकारी आणि नातेवाइकांमध्ये शोककळा पसरली आहे.


डॉ. नितीन अभिवंत हे २०१४ पासून ससून रुग्णालयाच्या मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्याआधी त्यांनी सोलापूरमध्ये पाच वर्षे सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. रुपाली अभिवंत (बी. जे. मेडिकल कॉलेजमधील PSM विभागात सहाय्यक प्राध्यापिका) आणि सात वर्षांचा मुलगा आहे.


या अकाली निधनाने एक अनुभवी आणि हसतमुख वैद्यकीय व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सहकाऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Teacher Promotion Stay: जिल्हा परिषद शिक्षकांच्या पदोन्नतीला तूर्त स्थगिती

मुंबई(सुहास शेलार): राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला तूर्त स्थगिती देण्याचे

Nanded News: 'दुष्काळात तेरावा महिना'! रील बनवण्याच्या नादात फटाक्यांची आतषबाजी; पाच एकर ऊस जळून खाक, Video

नांदेंड : महाराष्ट्रात आधीच भीषण दुष्काळजन्य परिस्थिती असताना, नांदेडमधून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल; दिवसा उन्हाचा चटका, रात्री गारवा, पुढील काही दिवस हवामान कोरडे

Maharashtra Weather : नोव्हेंबर महिन्यात राज्यातील हवामानात बदल जाणवू लागला आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारवा वाढत असून,

Central Government : रब्बी हंगामासाठी केंद्राकडून ६२ हजार ३७० कोटींची तरतूद

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खतांच्या वाढत्या किमतींच्या

इंस्टाग्राम रील्स बनवून मिळवा 1 लाख रुपये! महाराष्ट्र सरकारची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी नवी संधी

सोशल मीडियावर रील्स, शॉर्ट्स आणि व्हिडिओ तयार करणाऱ्या कंटेंट क्रिएटर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता

गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या 3 समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’चा अंतिम आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मुंबई: महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि महत्त्वपूर्ण कामगिरीची नोंद झाली आहे.