मुंबईकरांनो रविवारी रेल्वे प्रवास करण्याआधी हे वाचा

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वे सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक घेणार आहे.या वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नल आणि ओव्हरहेड वायरच्या देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, काही विलंबाने धावणार आहेत.


मध्य रेल्वे
स्थानक : सीएसएमटी ते विद्याविहार
मार्ग : अप आणि डाऊन धीमा
वेळ : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५
परिणाम : ब्लॉकवेळेत अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द तर काही सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.


हार्बर रेल्वे
स्थानक : पनवेल ते वाशी
मार्ग : अप आणि डाऊन
वेळ : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५
परिणाम : सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर आणि ठाणे ते वाशीदरम्यान धावणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ठाणे ते वाशी-नेरुळदरम्यान लोकल फेऱ्या उपलब्ध असणार आहेत.


पश्चिम रेल्वे
स्थानक : सांताक्रूझ ते गोरेगाव
मार्ग : अप आणि डाऊन धीमा
वेळ : सकाळी १० ते दुपारी ३
परिणाम : अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावरून धावणार आहेत. विलेपार्ले आणि राममंदिर स्थानकात फलाट उपलब्ध नसल्याने या स्थानकात लोकल थांबणार नाहीत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही विलंबाने धावणार आहेत.


दिव्यातील रेल्वे प्रवाशांचे होणार हाल
दुपारी १.३६ कल्याण-सीएसएमटी आणि दुपारी २.०२ कल्याण-सीएसएमटी (१५ डबा लोकल) या दोन्ही लोकलना दिवा थांबा देण्यात आलेला नाही. दुपारी १२.२३ कर्जत-सीएसएमटीला १.२७ वाजता, दुपारी १.२२ बदलापूर-सीएसएमटीला १.५६ वाजता, दुपारी १२.१९ कसारा-सीएसएमटीला १.४३ वाजता दिवा स्थानकात थांबा देण्यात आला आहे. यामुळे दिव्यातील प्रवाशांना कर्जत, बदलापूर, कसारातून प्रवाशांनी गच्च भरून येणाऱ्या लोकलमध्ये धक्काबुक्की करत प्रवेश मिळवणे आणि डब्यात शिरण्यास जागा नसल्यास दुपारीही पायदानावर लटकतच प्रवास करणे याशिवाय कोणताही पर्याय दिसत नाही.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने