नाशिकच्या राजकारणात भूकंप, सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप यांचा भाजपात पक्षप्रवेश

मुंबई : नाशिकमधील ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर नयना घोलप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप यांचा भाजपा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.


सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप यांचा पक्षप्रवेशाचा दिवस हा अतिशय नाट्यमय राहिला. गेल्या दोन दिवसांपासून बडगुजर आणि घोलप यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर त्यांचा आज पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली. पक्षप्रवेशावेळी भाजपाच्या इतर नेत्यांना येण्यास उशिर झाला. मंत्रिमंडळ बैठकीमुळे हा उशिर झाल्याचे कारण सांगण्यात येत होते. पण याबाबत विविध चर्चा सुरु होत्या. अखेर पक्षप्रवेशाने या चर्चांना पूर्णविराम मिळाला.


ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीच्या दोन दिवसांनंतर शिवसेना ठाकरे पक्षाने सुधाकर बडगुजर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत हकालपट्टी केली होती. पक्षाकडून झालेल्या कारवाईमुळे सुधाकर बडगुजर नाराज झाले होते. त्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र नाशिकमधील भाजपा आमदार सीमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला जोरदार विरोध केला. असे असले तरी आज (१७ जून) सुधाकर बडगुजर यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली.



सुधाकर बडगुजर यांनी भाजपात प्रवेश केला असला तरी त्यांच्या पक्षप्रवेशामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश दौऱ्यावर असताना त्यांच्या कसिनोचा फोटो सुधाकर बडगुजर यांनी व्हायरल केला होता. यानंतर विरोधकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली होती.


अशातच सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत मला माहिती नसल्याचे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केले. त्यांनी म्हटले की, सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. जोपर्यंत स्थानिक टीम असते, पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांच्याशी सल्लामसलत, एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही. आमच्याकडे बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते.


सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश आज दुपारी २ वाजता होणार होता. मात्र चंद्रशेखर बावनकुळे आलेच नाहीत. गिरीश महाजन यांनी वारंवार फोन केल्यावर चंद्रशेखर बावनकुळे दुपारी ३.३० वाजता आले. मात्र तोपर्यंत सुधाकर बडगुजर यांना पक्षप्रवेशासाठी ताटकळत राहावे लागले.


भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना सुधाकर बडगुजर म्हणाले, आज माझा भाजपात प्रवेश झाला. आदराने प्रवेश झाला, त्यामुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. गिरीश भाऊ संकटमोचक आहेत. आपत्ती आली की ते मार्ग काढतात आणि त्यांनी माझा मार्ग काढला. आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली हे माहिती नाही, मात्र मी निष्पाप आहे. कोव्हिडमध्ये मी चांगलं काम केलं, कोणी बाहेर येत नव्हतं. महापालिका निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल… ज्या पक्षाने कारवाई केली त्यांना सांगू इच्छितो. महाराष्ट्रात सांडपाण्यातून वीज निर्मिती प्रकल्प दिला. तो मुख्यमंत्र्यांनी दिला होता, ते दूरदृष्टीचे नेते आहेत. निष्ठेने काम करु आणि परिकाष्ठा करु, असंही बडगुजर यांनी सांगितलं.


यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित राज्याचा संकल्प झालाय. आम्ही सर्व कोअर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. बडगुजर आणि घोलप यांच्या पक्षप्रवेशाने पक्ष मजबूत होईल. अधिक ताकदीनं आम्हाला पुढे जाता येईल. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या संकल्पाला पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. विकासासाठी भाजपात पक्षप्रवेश होत असतो. कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यासाठी त्यांनी पक्षप्रवेश केला. सकाळी निघालो तेव्हा वाटलं २-३ दिवसांनी पक्षप्रवेश ठरेल. मात्र, आजच मंगळवार असल्याने त्यांनी आज ठरवलं.


पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, मनभेद नाहीत, मतभेद आहेत ते देखिल दूर होईल याचा विश्वास आहे. कोणी एखाद्या पक्षात असतो तेव्हा तो वाढवण्यासाठी पुढे जात असतो, कधी शिंतोडे उडवतो. मात्र, आता जबाबदारी आहे की जुन्या नव्यांना घेऊन पुढे जायचं आहे. ज्या पक्षाला आयुष्य देतो तिथे अपमान होत असेल आणि काळजी होत नसेल तर बरोबर नाही. नाशिकात येतील तेव्हा मेळावा घेऊयात, जे राहिले आहेत त्यांचा पक्षप्रवेश करूयात. भाजपा तुमची प्रतिष्ठा कधीही कमी होऊ देणार नाही. पक्षात कधी वाटणार नाही कधी की नवीन घरात गेलोय. जुन्या नव्या कार्यकर्त्यांना एकत्र करत सर्वांनी राहावं इतकीच विनंती करतो.


गिरीश महाजन म्हणाले, प्रवेश कधी होणार? अशा बातम्या बऱ्याच दिवसापासून चालल्या होत्या. आज तो दिवस आलेला आहे. मी सुधाकर बडगुजर यांचे अभिनंदन करतो. निवडणुका समोर आहेत, नाशिक बालेकिल्ला आहे. गेल्या वेळी ६८ नगरसेवक होते, आणि आता किती करायचे, १०० पार करायचे…आपण सर्व मिळून आता प्रयत्न करूयात. जास्तीत जास्ती पालिका, परिषदा हाती घ्यायच्या आहेत. आपण महायुतीत आहोत.

Comments
Add Comment

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात