मध्य रेल्वेवर प्रथम श्रेणी डब्यांमध्ये कारवाई सुरूच

मुंबई : लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये काल सोमवारपासून केंद्र तिकीट तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सोमवारी १७१ प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला तर आज दुसऱ्या दिवशीही ही कारवाई सुरूच होती. आज सकाळच्या वेळेस १४९ प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली व त्यांच्याकडून २६ हजार ७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.


प्रथम श्रेणी डब्यांमध्ये अनधिकृत प्रवासाच्या तक्रारी सातत्याने वाढत असल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेने काल सोमवारपासून विशेष तिकीट तपासणी पथक आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी सर्वप्रथम श्रेणी डब्यांमध्ये टप्प्याटप्प्याने व संपूर्ण प्रवासादरम्यान तैनात केले होते .


आजही सकाळी रेल्वेच्या नऊ गाड्यांमध्ये मध्य रेल्वे , हार्बर रेल्वे व ट्रान्स हार्बर रेल्वे या तिन्ही मार्गांवर एकूण १४९ प्रवाशांना पकडण्यात आले त्यात ५८ रेल्वे कर्मचारी , ९ आरपीएफ पोलीस व ८२ इतर प्रवासी होते . त्यांच्याकडून रेल्वेने तात्काळ २६ हजार ७० रुपयांचा दंड वसूल केला . ही कारवाई सकाळी गर्दीच्या वेळेस एकूण नऊ गाड्यांमध्ये अंबरनाथ - दादर, टिटवाळा- दादर, बदलापूर - दादर , ठाणे - पनवेल व पनवेल - कुर्ला यादरम्यान करण्यात आली. सर्वाधिक प्रवाशांवर कारवाई ही ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर करण्यात आली. तेथून एकूण ९ रेल्वे कर्मचारी एक आरपीएफ पोलीस व २२ इतर प्रवासी यांच्याकडून एकूण ६ हजार ८१० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सायंकाळी ही गर्दीच्या वेळेस एकूण आठ रेल्वेच्या डब्यात ही कारवाई करण्यात येणार असून ही कारवाई पुढेही अशीच सुरु राहणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर