मिठी नदीला जोडणाऱ्या नाल्यात थर्माकॉल, पार्सल बॉक्स

महापालिकेने औद्योगिक कचरा टाकणाऱ्यांविरोधात पोलिसांत नोंदवली तक्रार


मुंबई : मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांमध्ये औद्योगिक कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारामुळे नाले तुंबण्याचा धोका निर्माण होत असून, परिणामी शहरात पाणी साचण्याची समस्या वाढत आहे. धारावी येथील मिठी नदी आणि नाला जोडणाऱ्या टी जंक्शन नाला स्वच्छ केल्यानंतरही त्यात औद्योगिक कचरा मोठ्या प्रमाणावर टाकल्याचे आढळून आले आहे. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने शाहुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तरंगत्या कचऱ्यात थर्माकॉल, बॉक्स, फ्रीजच्या आतील भागातील फोम आदींचा मोठ्या प्रमाणात समावेश असून भंगार दुकान, फ्रीज दुरुस्त करणारे व्यावसायिक आणि इलेक्ट्रॉनिक्स दुकान आदींमधून हा कचरा टाकण्यात आलेला येथील अनधिकृत चालवल्या जाणारी भंगार दुकान आणि इतर गाळ्यांवर महापालिका कधी बुलडोझर चालवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.


पावसाळी कामांचा भाग म्हणून, मुंबई महानगरातील नद्या आणि नाल्यांमधील गाळ काढण्यात येत आहे. गाळ काढण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून या कामी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर केला जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून गाळ काढण्याच्या कामात परिणामकारकता व पारदर्शकता यामध्ये वाढ होण्यास मोठी मदत होत आहे. मोठ्या व छोट्या नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले असले तरी भरतीसोबत तरंगता कचरा जमा झाल्यामुळे नालेसफाई वारंवार करावी लागत आहे.
नाल्यांमध्ये कचरा जाण्यापासून रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. नाल्यांमध्ये येणाऱ्या या कचऱ्यास प्रतिरोध करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणी जाळी बसविली आहे. तरीही, काही व्यक्ती तथा गाळेधारक नाल्यांमध्ये थर्माकॉल, फर्निचर, रबर, रॅपर्स असा विविध प्रकारच्या तरंगत्या वस्तू टाकत आहेत. त्यामुळे सांडपाणी वहन, निचरा होण्यास अडथळे निर्माण होत आहे.


धारावी येथील टी जंक्शनकडे जाणाऱ्या नाल्याची महानगरपालिकेने नुकतीच स्वच्छता केली आहे. गाळ काढण्याबरोबरच तरंगत्या वस्तूदेखील काढण्यात आल्या. तरीही, सोमवारी, १६ जून २०२५ रोजी जी उत्तर विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता अज्ञातांनी या नाल्यात थर्माकॉल, रबर, रॅपर्स, पार्सल बॉक्स आदी औद्योगिक अशा विविध वस्तू टाकल्याचे निदर्शनास आले. त्याची गंभीर दखल घेत आणि वरिष्ठांच्या सूचनेनुसार, शाहुनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. नालेसफाईच्या कामात अडथळा निर्माण करणारी ही कृती गंभीर असून यामुळे आपत्ती व्यवस्थापनास अडचणी निर्माण होत आहे. यासंदर्भात भारतीय न्यायसंहिता २०२३ कलम ३२६ (क) अन्वये दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




  • कुठून येतो असा कचरा

  • भंगार दुकान

  • कचरा संकलन करणारे कचरा वेचक

  • टीव्ही आणि फ्रिज

  • दुरुस्त करणारे

  • वाहनांचे सीट

  • कव्हर बनवणारे

  • जुने मेट्रासिस बनवणारे

  • वाहने दुरुस्त

  • करणारी गॅरेज


Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.