Reliance Consumers: कंपनीकडून मोठे पाऊल! 'इतक्या' हजार कोटींची भांडवली गुंतवणूक करणार!

कंपनीकडून Price War सुरु !


प्रतिनिधी: रिलायन्स कंज्युमर प्रॉडक्ट्स (Reliance Consumer Products) कॅम्पा कोला व त्यांच्या इतर शीतपेये उत्पादनांच्या वृद्धीसाठी कंपनीने ८००० कोटींची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या १२ ते १५ महिन्यात ही गुंतवणूक होणार आहे. मुकेश अंबानी संचलित रिलायन्स कंज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीने आपली प्रॉडक्ट लाईन (Product Line) वाढवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. कंपनीने या उद्दिष्टअंतर्ग त विविध ठिकाणी १० ते १२ प्रकल्प (Plant) सुरु करण्याचे ठरवले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक लागेल यामुळे हा रिलायन्सचे नवे पाऊल असेल.


कोकाकोला,पेप्सिको व तत्सम इतर ब्रँडसह अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. यापूर्वी मुकेश अंबानी यांच्या कंपनीने पुन्हा एकदा बाजारात 'कॅम्पा' चे रिब्रँडिंग करून बाजारात आणले होते. त्यामुळे स्पर्धेची पातळी नव्या उच्चांकावर पोहोचली होती. आता नव्या आणखी प्रकल्पासह कंपनी आणखी नवी बेवरेज उत्पादने बाजारात आणू शकते. त्यामुळेच या कंपन्यांमध्ये आगामी काळात किंमतीची स्पर्धा (Price War) सुरू होईल का हा प्रश्न नव्याने उपस्थित होत आहे.


रिलायन्स व त्यांचे भागीदार हे ६००० ते ८००० कोटींची भांडवली गुंतवणूक करतील असे प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. फेब्रुवारी महिन्यात रिलायन्सने गुवाहाटी येथे प्रकल्प उभारला होता. आता नजीकच्या काळात बिहारमध्येही सुरु होणार आहे. या स्पर्धात्मक किंमतीसाठी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन यांच्याशी रिलायन्सने भागीदारी करत त्यांना ब्रँड अँबेसेडर बनवले होते. पेप्सिकोला मात देण्यासाठी कंपनीने २५० मिलीलिटर (250 ML)ची शीतपेयाची बाटली १० रूपयांत सुरू केली होती. इतर कंपन्या साधारण २० रुपयाला शीतपेये विकत असताना कॅम्पाची अर्ध्या किंमतीत मिळत आहे. याशिवाय कंपनीची इतरही काही एफएमसीजी (FMCG) उत्पादने आहेत.


कंपनीला मार्च २०२७ पर्यंत राष्ट्रीय स्तरावर ग्राहक पोर्टफोलिओ उपलब्ध करून द्यायचा आहे, पुढील वर्षी मार्च पर्यंत सुमारे ७०% उपलब्धता पेये सारख्या श्रेणींसाठी असेल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मागील वेळी प्रसारमाध्यमांना सांगित ले होते. तज्ञांच्या मते भारतीय शीतपेये बाजार ६७००० कोटींपर्यंत नजीकच्या काळात जाऊ शकतो. तर आर्थिक वर्ष २०३० पर्यंत हा बाजार १.४७ लाख कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. बाजारपेठेतील मोठा वाटा मिळवण्यासाठी कंप नीने त्यांच्या ज्यूस, स्पोर्ट्स, कोला, हायड्रेशन ड्रिंक्सची किंमत या विभागातील प्रमुख प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सुमारे २० ते ४० टक्के कमी ठेवली आहे.

Comments
Add Comment

Kolkata Stampede: अरुंद प्रवेशद्वार, अंधार अन् अफवा; दुर्गापूजा मंडपातील चेंगराचेंगरीचं कारण काय?

कोलकाता येथील चोरबागान दुर्गा पूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, आयोजकांच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध