Friday, October 16, 2026

शिवसेनेच्या वर्धापन दिनी व्यंगचित्रातून उद्धव सेनेची उडवली खिल्ली

मुंबई : शिवसेना या पक्षाची स्थापना १९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी केली. या पक्षाच्या स्थापनेला आज म्हणजेच गुरुवार १९ जून २०२५ रोजी ५९ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन सोहळा वरळीतील एनएससीआय डोममध्ये होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याप्रसंगी शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. उद्धव सेनेत गोंधळाची स्थिती उद्धव सेनेची म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाच्या पक्षाची स्थापना १० ऑक्टोबर २०२२ रोजी झाली. पण उद्धव सेनेनेही १९ जून रोजी सभेचे आयोजन केल्याचे जाहीर केले आहे. यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. उद्धव सेनेचा म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाच्या पक्षाचा वर्धापन दिन १० ऑक्टोबर रोजी आहे. या परिस्थितीत १९ जून रोजी एकदा आणि १० ऑक्टोबर रोजी दुसऱ्यांदा असा एकाच पक्षाचा दोन वेगवेगळ्या दिवशी वर्धापन दिन साजरा करावा का, असा संभ्रम नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. हीच बाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक शिवसैनिकाने व्यंगचित्रातून मांडली आहे. हे व्यंगचित्र व्हायरल होत आहे. खरी शिवसेना खऱ्या शिवसेनेचे नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. शिउबाठाने आज कार्यक्रमाचे आयोजन करणे हास्यास्पद असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक शिवसैनिक व्यक्त करत आहेत. ज्या पक्षाची स्थापनाच १० ऑक्टोबर २०२२ रोजी झाली त्यांनी १९ जून रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्याला काही अर्थच नाही, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >