Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सरकारने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय; आता महिलांना…

मुंबई : लाडक्या बहिणींसाठी आता महत्वाची माहिती आहे. गेमचेंजर ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेचे मानधन सध्या १५०० रुपये दिले जात आहे. पण, आता देखील राज्यातील महिलांसाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहे. राज्यातील महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी सरकारने ९ टक्के अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मुंबई येथे बैठक पार पडली. यामध्ये शासकीय महामंडळांच्या महिलांसाठीच्या व्याजपरतावा योजनांची सांगड मुंबई बँकेच्या कर्ज योजनेशी घालण्यासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि विविध महामंडळांमार्फत राबवल्या जाणाऱ्या कर्ज योजनांच्या एकत्रित अंमलबजावणी संदर्भात निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘राज्य शासन महिलांना केवळ सन्मान देत नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचाही ठोस प्रयत्न करत आहे’.


दरम्यान, महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी सरकारने आता ९ टक्के अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम मुंबई बँक आणि विविध विकास महामंडळांच्या माध्यमातून संयुक्तपणे राबविला जाणार आहे.



वैयक्तिक आणि सामूहिक कर्ज मिळणार


‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी महिलांना वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात कर्ज देण्यात येणार असून, त्यातून त्यांना व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी भांडवली मदत मिळणार आहे. पर्यटन संचालनालय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ यांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध कर्ज योजना कार्यान्वित आहेत. या निर्णयामुळे महिलांना उद्यमशीलतेकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असून, त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढणार आहे.



लाडक्या बहिणींसाठी नवीन उपक्रम


याबाबत बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, शासनाच्या ८ मार्च २०१९ रोजी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांची नोंदणी प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यामध्ये महिलांसाठी वार्ड प्रभाग ठिकाणी पतसंस्था स्थापन केली जाणार आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई येथे ही पतसंस्था स्थापन केली जाणार आहे. ही पतसंस्था स्थापन करण्यासठी सभासद संस्था १ हजार असणे गरजेचे आहे. या संस्थेच्या नोंदणीवेळा १५ लाख रुपयांचे भांडवल असणे गरजेचे आहे. भांडवल असेल तरच पतसंस्था स्थापन करण्यासाठी परवानगी दिली जाईल. उर्वरित महापालिका ठिकाणी ८०० सदस्य असणे गरजेचे आहे.



जूनचा हप्ता कधी?


जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. लाडक्या बहिणी जूनच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या महिन्याच्या शेवटच्या २ आठवड्यात कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने