Nestle India Bonus Shares: नेस्ले इंडियाकडून ऐतिहासिक Bonus Shares घोषणेनंतर शेअर्समध्ये १% वाढ

प्रतिनिधी: नेस्ले इंडिया (Nestle India) चा समभाग सकाळी बीएसईवर १% उसळला आहे.कंपनीने आपल्या कारकीर्दीत प्रथमच भागभांडवलधारकांना आश्चर्यकारक धक्का दिला आहे. नेस्ले इंडियाने बीएसई (Bombay Stock Exchan ge BSE) वर केलेल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार,कंपनीने आपल्या भागभांडवलधारकांसाठी (Shareholders) साठी एका समभागावर एक समभाग (१:१) अशा बोनस शेअर (Bonus Share) जाहीर करण्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट झाले. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आज २६ जून रोजी ही बैठक होईल.

कंपनीच्या बैठकीत यावर चर्चा अपेक्षित असल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष या शेअर्सच्या हालचालीवर केंद्रित असू शकते. कंपनीने १९ जूनला आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीची घोषणा केली होती. त्यातील माहितीनुसार, कंपनी २६ जून २०२५ रोजी संचालक मंडळाची (Board of Directors) ची बैठक आयोजित केली गेली आहे. बोनस शेअर्सवर विचारविनिमय या बैठकीदरम्यान होईल त्यासाठी आवश्यक असलेल्या मुद्यांवर चर्चा होईल.'असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.असे झाल्यास नेस्ले इंडिया आपल्या इतिहासात प्रथमच बोनस शेअर जाहीर करू शकतो. याशिवाय नेस्ले कंपनीने १० रूपयांचा लाभांश (Dividend) सुचवला आहे. दर्शनी १ रूपये मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सवर हा लाभांश मिळू शकतो.बैठकीत बोनस शेअर्सचा विचार करण्याच्या घोषणेनंतर नेस्ले इंडियाच्या शेअर्स वाढतच आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, १९ जून रोजी बंद झालेल्या पातळीपासून ती जवळजवळ ५% ने वाढली आहे.

नेस्ले इंडियाने आर्थिक वर्ष २५ च्या मार्च तिमाहीत ८८५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा (Net Profit)नोंदवला, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ९३४ कोटी रुपयांपेक्षा ५% कमी आहे. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या समभागात १२.९७%, गेल्या ३ महिन्यांत ८.३० % वाढ झाली आहे. त्यापूर्वी कंपनीने केलेल्या कामगिरीनंतर नेस्लेचे शेअर्स पुन्हा कमबॅक करत आहेत.
Comments
Add Comment

Koffee With Karan 9: रश्मिका विजयच्या पाठी लग्नासाठी हात धुवून पाठी लागलेली, स्वत: अभिनेत्रीनेच केला शॉकिंग खुलासा

मुंबई: करण जोहरचा सुप्रसिद्ध चॅट शो, 'कॉफी विथ करण' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या ह्या शोचा नऊवा सीझन सुरू आहे.

‘रणबाली’ची बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात, दुसऱ्या दिवशी किती कमाई?

विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा पीरियड अ‍ॅक्शन ड्रामा 'रणबाली' या चित्रपटाच्या देशांतर्गत कमाईत

OTT वर नव्या रोमँटिक कॉमेडीचा धुमाकूळ! 6 भागांची सिरीज टॉप 10 मध्ये

दर आठवड्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही ना काही नवीन प्रदर्शित होत असतं. रोमँटिक सिनेमा किंवा सिरीज हे

Neeti Mohan: प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर नीती मोहनवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचं छत्र हरपलं

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड गायिका नीती मोहनवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गायिका नीती मोहन, कॉरियोग्राफर शक्ती मोहन

आता तिकीट बुकिंग होणार सोपी! 'या' गाड्यांचे PNR नंबर्स बदलणार

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या तिसऱ्या

Sindhudurg Crime: शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी मुंबईला जाण्याचं स्वप्न अधुरं; कुडाळमध्ये एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणीची हत्या

कुडाळ तालुक्यातील कडावल वर्दे रस्त्यावर शनिवारी (१७ ऑक्टोबर) एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणीची हत्या