मुंबई बॉम्बस्फोटांच्या गुन्हेगाराचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू

नवी दिल्ली : भारतात दहशत पसरवण्याच्या कटात सहभागी असलेला ISIS चा भारतातील प्रमुख साकिब अब्दुल हमीद नाचन याचा मेंदूत रक्तस्त्राव अर्थात ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे मृत्यू झाला. नाचन जन्मठेपेची शिक्षा भोगत होता आणि दिल्लीच्या तिहार तुरुंगात होता. तब्येत बिघडल्यामुळे त्याला दिल्लीच्या दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले. तिथल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथेच नाचनने अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी तपासणी करुन त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

साकिब नाचनचा शनिवार २८ जून २०२५ रोजी दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी मृत्यू झाला. तो २००२-०३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सिमी आणि आयसिस या भारतात बंदी घातलेल्या संघटनांसाठी तो काम करत होता. दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात होता.

डिसेंबर २०२३ मध्ये, एनआयएने अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने त्याला महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील पडघा गावातून इतर १५ जणांसह अटक केली. आयएसआयएसच्या निर्देशानुसार तो बॉम्ब तयार करत होता. भारतात दहशतवादी हल्ल्यांसाठी कट रचणे, हल्लेखोरांना आवश्यक ती मदत पुरवणे ही कामं तो करत होता.

साकिब नाचन तरुणांना 'बयात' म्हणजेच आयसिसच्या खलिफाच्या निष्ठेची शपथ घेण्यास भाग पाडून संघटनेत भरती करत होता. पडघाला मुक्त क्षेत्र घोषित करून त्याने तिथे कट्टर (मूलतत्ववादी) विचार पसरवण्याचे काम सुरू केले होते.

साकिब नाचनच्या नेतृत्वात २००२ - ०३ मध्ये मुंबईत विलेपार्ले, मुलुंड आणि मुंबई सेंट्रल येथे बॉम्बस्फोट करण्यात आले. या तीन स्फोटांमुळे मुंबई हादरली होती. बॉम्बस्फोटांत १३ जणांचा मृत्यू झाला होता आणि ११६ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणात दहा जणांना दोषी ठरवले होते. दोषींपैकी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
Comments
Add Comment

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता

Trump Ukraine : ट्रम्प यांचा युक्रेनला दुहेरी धक्का! रशियाकडून तेल खरेदी अन् स्टारलिंकवर निर्बंध?

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवून देत अमेरिकेने युक्रेनला एकाच वेळी दोन मोठे धक्के दिले आहेत.

Crime News : ठाण्यात खतरनाक प्रकार! १७ वर्षीय मित्राची हत्या करून मृतदेह जाळला अन् थेट पोलीस चौकीजवळच पुरला

ठाणे : महाराष्ट्रातील ठाणे (Thane Crime News) शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि अंगावर का आणणारी घटना समोर आली आहे. ठाण्यातील

माफी नाही! निळ्या ड्रम हत्याकांडानंतर आता 'साप कांडा'तील दोषींनाही फाशी, मेरठ न्यायालयाचा निर्णय

निळ्या ड्रम हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर अवघ्या दोन दिवसात आणखी एका प्रकरणात

सायबर सिक्युरिटीमध्ये करिअरची संधी? NISM चे 2 नवीन कोर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : आर्थिक आणि तांत्रिक सुरक्षेला बळ देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सने (एनआयएसएम) एक