पाच तारखेचा मोर्चा निघणार नाही, सर्वपक्षीय नेत्यांचा निर्णय

मुंबई : मागील सरकारमध्ये उद्धव ठाकरे  मुख्यमंत्री असताना हिंदी भाषा सक्तीकरणाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज्यात काही दिवसांपासून हिदी भाषावरुन राजकारण चांगलंच तापल होत. थोड्याच वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदी भाषा सक्तीकरणाचा जी.आर. रद्द केल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी पाच तारखेचा मोर्चा रद्द केला. उद्धव ठाकरेंचा काळात घेण्यात आलेला निर्णयाला राज्य सरकारकडून विरोध करण्यात आल्यामुळे मराठी जनतेने देखील फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.


देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत हिंदी भाषा सक्तीकरणाचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट करुन, हिंदी भाषेला पाठिंंबा कुणाचा होता ? हिंदी भाषेची सक्ती करण्यासाठी नेमका मुद्दा कुणी मांडला? यांसारखी माहिती जनतेसमोर पत्रकार परिषदेतून उघड केली. त्यामुळे मराठी जनतेने फडवीस सरकारचे आभार मानले आहेत.


फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून राज ठाकरे यांनाही प्रश्न केला. हिंदी भाषा सक्तीकरणाला विरोध करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारा, हिंदी भाषा शालेय शैक्षणिक वर्षात सामावेश करण्यासाठी मंत्रालयात निर्णय कुणी घेतला होता?  त्यामुळे तुम्ही कोणत्या तोंडाने आंदोलन करता असा सवाल फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून उपस्थित केला. त्यामुळे फडणवीस सरकारच्या पत्रकार परिषदे नंतर मराठी जनतेने सरकारला पाठिंबा दर्शवला.



 

 

 
Comments
Add Comment

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत