Industrial Production Output: औद्योगिक उत्पादनात मे महिन्यात १.२% वाढ

प्रतिनिधी: भारताच्या औद्योगिक उत्पादनात मे महिन्यात नऊ महिन्यातील सर्वांत कमी वेगाने वाढ झाली आहे. भारताच्या सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाने आज मे महिन्याची औद्योगिक आकडेवारी जाहीर केली आहे. मे महिन्यात भारतीय औद्योगिक उत्पादनात १.२% वाढ झाली आहे जी मागील ९ महिन्यात सर्वांत कमी वेगाने झालेली ही वाढ आहे. प्रामुख्याने खाण उद्योगातील व कच्च्या मालाच्या पुरवठ्यात घसरण झाल्याने ही औद्योगिक वाढ घसरल्याचे या मध्ये म्हटले  आहे. औद्योगिक उत्पादनातील ७८% वाटा हा उत्पादनाचा आहे. यामध्ये एप्रिल २०२५ मध्ये ३.१% औद्योगिक उत्पादन झाले होते ते मे महिन्यात घसरून २.६% झाले आहे. मागील वर्षाच्या मे महिन्यात उत्पादनात ५.१% वाढ झाली होती. विद्युत उर्जा निर्मितीही संख्यात्मकदृष्ट्या घट झाली आहे. मागील एप्रिल महिन्यातील तुलनेत मे महिन्यात उर्जा उत्पादनातील १.७% घसरण झाल्याने उर्जा निर्मिती ५.१% वाढली आहे.

एप्रिल महिन्यात खाणकाम उद्योगात मे महिन्यात ०.१% घसरण झाली आहे जी एप्रिल महिन्यात मार्चमधील तुलनेत ०.२% घसरली होती.

भांडवली वस्तू उत्पादनात जबरदस्त वाढ !

भांडवली वस्तू उत्पादनात (Capital Goods Manufacturing) तब्बल १४.१% वाढ मे महिन्यात झाली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ही वाढ फक्त २.१% अधिक आहे. एप्रिल २०२५ मध्ये ही वाढ १४% होती ती मे महिन्यात ०.१% किंचित वाढून १४.१% पर्यंत पोहोचली आहे.

इन्फ्रास्ट्रक्चर व बांधकाम उत्पादनात मोठी वाढ !

मूलभूत सुविधा (Infrastructure) व बांधकाम उत्पादन (Construction Goods) यामध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यातील ४.७% तुलनेत मे महिन्यात ६.३% वाढ झाली आहे.

प्राथमिक वस्तू उत्पादनात घसरण !

प्राथमिक वस्तूतील उत्पादनात (Primary Goods Manufacturing) उत्पादनात एप्रिलच्या तुलनेत १.९% घसरण झाली आहे. एप्रिल महिन्यातील प्राथमिक वस्तू उत्पादनात घसरण झाली आहे एप्रिल २०२५ मध्ये ही घसरण आणखी ०.२% झाली होती. उलटपक्षी मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यातील उत्पादनात ७.३ वाढ झाली होती.  तपशीलवार आकडेवारी उत्पादन क्षेत्रातील प्रमुख उद्योग गटांच्या लवचिकतेवर प्रकाश टाकते. राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरणाच्या २३ उद्योग गटांपैकी १३ मध्ये सकारात्मक वाढ नोंदवली गेली.

एमएस ब्लूम्स, बिलेट्स, इनगॉट्स, पेन्सिल इनगॉट्स, एमएस स्लॅब्स आणि मिश्र धातुच्या स्टीलच्या फ्लॅट उत्पादनांसारख्या वस्तूंच्या मजबूत उत्पादनामुळे मूलभूत धातूंचे उत्पादन ६.४ टक्क्यांनी वाढले. इतरत्र वर्गीकृत नसलेल्या यंत्रसामग्री आणि उपकरणांचे उत्पादन ११.८ टक्क्यांनी वाढले आहे ‌.ज्याला ऑटोमोटिव्ह नसलेल्या वापरासाठी विभाजक, डिकेंटर सेंट्रीफ्यूज, विविध प्रकारचे पंप आणि स्थिर अंतर्गत ज्वलन पिस्टन इंजिनच्या निरोगी उत्पादनामुळे पाठिंबा मिळाला. सिमेंट, सिमेंट क्लिंकर आणि काचेच्या वस्तूंच्या उत्पादनामुळे इतर नॉन-मेटॅलिक खनिज उत्पादनांचे उत्पादन ६.९ टक्क्यांनी वाढले आहे.
Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली