'ड्रग तस्करी प्रकरणी मकोका अंतर्गत कायदेशीर कारवाई होणार'

मुंबई : ‘एनडीपीएस’अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध झाल्यास आता संघटित गुन्हेगारीअंतर्गत त्यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा या अधिवेशनातच केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके, एकनाथ खडसे यांनी ड्रग तस्करी संदर्भात प्रश्न विचारला होता, त्यास मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र एनडीपीएस युनिट स्थापन करण्यात आले असून त्यात अधिकारी व अंमलदारांची नियुक्तीही केली आहे. जिल्हा स्तरावर समन्वय समित्याही स्थापन करण्यात आल्या आहे. यात गेल्या दोन-अडीच वर्षांत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या मदतीने आता राज्यस्तरीय आणि आंतरराज्यीय समन्वय अधिक प्रभावी झाला आहे. सर्व राज्यांमध्ये ‘इंटेलिजन्स’ शेअरिंग सुरू असून त्यामुळे तस्करांवर एकत्रितपणे कारवाई शक्य झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

व्यसनमुक्तीसाठीची केंद्रे महत्त्वाची असून सध्या त्यांची संख्या आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी योग्य धोरण तयार करून दर्जेदार व्यसनमुक्ती केंद्रांची उभारणी केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गांजाच्या शेतीवर बंदी असून ती मध्यप्रदेशातही कायदेशीर नाही, हे स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले की, गांजा, गुटखा किंवा तत्सम पदार्थांची तस्करी होत असल्यास त्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल.
Comments
Add Comment

कांदिवली रेल्वे स्थानकात हायव्होल्टेज ड्रामा! हुज्जत घालताना महिला टीसीचे कपडे फाटले; GRP, RPF पोलिसांचा हस्तक्षेप

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर महिला टीसीची आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या महिलेमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना

जन आरोग्य योजनेत महागड्या चाचणीचा समावेश, 63 उपचारांचा 'अतिरिक्त निदान प्रक्रिया' म्हणून योजनेत समावेश

मुंबई: कर्करोगाचे अचूक निदान, आजाराचा टप्पा निश्चित करणे आणि उपचारांचा परिणाम तपासण्यासाठी महत्त्वाची असलेली

Eknath Shinde : दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेतील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागवले रिपोर्टकार्ड

नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Assembly)पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील

मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील स्वयंपाकघराचा परवाना निलंबित, FDA ची कारवाई

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) मुलुंड येथील फोर्टिस रुग्नालयातील स्वयंपाक घराचा परवाना

Ekta Kapoor : "धर्माचं पालन करणं ही समस्या कधीपासून झाली?"; चित्रपटसृष्टीतील 'हिंदूफोबिया'वर एकता कपूर संतापली

टेलिव्हिजन विश्वाची 'क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आपल्या बोल्ड व यशस्वी कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या

BMC : पवई तलाव चक्क ३२ टक्के गाळाने भरला; पाणलोट क्षेत्रात पाण्याचे प्रमाण झाले कमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील गाळाचे आतापर्यंत ११ ते १२ टक्के असतानाच